कमला मिल आग प्रकरणी जुहूतील हाॅटेलचालकाला अटक

त्याच्याकडे वन अबव्हचा फरार संचालक अभिजीत मानकरची गाडी सापडली आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 10, 2018 05:41 PM IST

कमला मिल आग प्रकरणी जुहूतील हाॅटेलचालकाला अटक

10 जानेवारी :  कमला मिल आग प्रकरणी जुहूतील हाॅटेल व्यावसायिक विशाल करियाला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. त्याच्याकडे वन अबव्हचा फरार संचालक अभिजीत मानकरची गाडी सापडली आहे.

कमला मिल आग प्रकरणात वन अबव्हचे संचालक क्रिपेश संघवी, जीगर संघवी, अभिजीत मानकर, मोजोसचे मालक युग पाठक, युग तुलीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय.  युग पाठक आधीच बेड्या ठोकल्या. तर वन अबव्हचे तिघेही संचालक फरार आहेत. तिघांचा शोध सुरू असताना ३ जानेवारीला मानकरची गाडी रस्त्यावर फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या दिशेने तपास सुरू झाला आणि मंगळवारी एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी जुहू परिसरातून हॉटेल व्यावसायिक विशाल करियाला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून मानकरची गाडी जप्त केली.

२९ डिसेंबरच्या पहाटे साडेतीन वाजता क्रिपेश संघवीने ही गाडी त्याला आणून दिली होती. त्यानंतर, तो या गाडीचा वापर करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितलं. त्यामुळे तिघांच्या फरार होण्यामागचे गुढ वाढलं आहे.

आरोपींना फरार होण्यात मदत केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. करिया याचे हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार, क्रिकेटपटूंसोबत जवळचे संबंध असल्याची माहितीही उघडकीस आली आहे. सेलिब्रिटींसोबतचे फोटो त्याने सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2018 05:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...