28 डिसेंबर : कमला मिल अग्निकांडातील दोषींवर फौजदारी कारवाई करणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये.
मुंबईतील लोअर परेल भागातील कमला मिलमध्ये हॉटेल मोजोसला आग लागली होती. या अग्नितांडवात 14 जणांचा मृत्यू झालाय. या घटनेनं प्रशासनाला चांगलाच हादरा बसलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमला मिलमधल्या आगीच्या ठिकाणी भेट दिली.
ही दुर्घटना भीषण आणि दुर्दैवी आहे. या प्रकरणी बीएमसीच्या 5 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अॅजाॅय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून तशी कारवाई होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
तसंच या प्रकरणात बीएमसीचे अधिकारी दोषी आढळले तर त्यांच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल होतील अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
=================================================================
संबंधित बातम्या
=================================================================
कमला मिल अग्नितांडव : पाचगणीला जाण्याआधीच त्यांना गाठलं मृत्यूनं
कमला मिल अग्नितांडव- राहुल गांधींनी मराठीतून ट्विट करून दिली मृतांना श्रद्धांजली
कमला मिल अग्नितांडव : मृत्यूपूर्वी विश्व आणि धैर्यने वाचवले अनेकांचे प्राण
=================================================================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा