कमला मिल आग प्रकरण : त्या तिघांना जामीन मंजूर

डिसेंबर 2017 साली मुंबई परळ भागातील कमला मिल आग प्रकरणातील वन अबाव्ह पबचे मालक असलेले के. सिंघवी, जी. सिंघवी आणि अभिजीत मानकर यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 12, 2019 02:20 PM IST

कमला मिल आग प्रकरण : त्या तिघांना जामीन मंजूर

मुंबई, 12 फेब्रुवारी - अक्षल कुडकेलवार : डिसेंबर 2017मध्ये मुंबई परळ भागातील कमला मिल आग प्रकरणातील वन अबाव्ह पबचे मालक असलेले के. सिंघवी, जी. सिंघवी आणि अभिजीत मानकर यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. 14 महिन्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला आहे. या आगीमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी तिन्ही आरोपींना न्यायालयानं जामीन मंजूर केला. यापूर्वी उच्च न्यायालयानं या तिन्ही जणांना जामीन नाकारला होता. त्यानंतर जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज केला गेला होता.

29 डिसेंबरची ती काळरात्र

29 डिसेंबर 2017 रोजी नववर्षाच्या स्वागताची तयारी सर्वत्र जोरात सुरू होती. मुंबईतील हॉटेल्स, पब अशी अनेक ठिकाणं नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली होती. त्या दिवसांमध्ये मुंबईतील माहोल वेगळाच होता.

पण, अशा या वातावरणात मुंबईला सुन्न करणारी बातमी धडकली. परळ भागातील कमला मिल कंपाऊंडमध्ये असलेल्या वन अबाव्ह पबला आग लागली होती. त्यानंतर मुंबई हादरली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आगीवर नियंत्रण मिळवलं. पण, यादरम्यान 14 जणांना आपले जीव गमवावे लागले होते.

Loading...

तर, काही जण जखमी देखील झाले होते. आग लागली तेव्हा जवळपास 150 लोक पबमध्ये होते.

राफेल : राहुल गांधीचा मोदींवर सर्वात मोठा आरोप; UNCUT पत्रकार परिषद
 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 02:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...