कमला मिल अग्नितांडवात वन-अबव्ह आणि मोजोस या पब मालकांवर गुन्हा दाखल

कमला मिल अग्नितांडवात वन-अबव्ह आणि मोजोस या पब मालकांवर गुन्हा दाखल

304 कलमातर्गंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या दोन्हीही पब मालकांच्या विरोधात पोलिसांकडून दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

29 डिसेंबर : मुंबईच्या कमला मिल परिसरातल्या, वन-अबव्ह रेस्टारंटला काल रात्री आग लागली आहे. या आगीत जळून खाक झालेल्या वन-अबव्ह आणि मोजोस या पब मालकांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 304 कलमातर्गंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या वन-अबव्ह आणि मोजोस या पब मालकांवर पोलिसांकडून दाखल करण्यात आला आहे.

कशी लागली आग?

या आगीत सगळं जळून खाक झाल्याने नेमकी आग वन-अबव्ह लागली की मोजोसला लागली हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. पण या पबवर पावसाळ्यात ताडपत्री आणि बांबूच्या साहाय्याने  रुफ टॉप कव्हर करण्यात आलं होतं. ऑडिओ प्रुफिंगसाठी आतल्या बाजूनं काळ्या कापडाचा वापरही करण्यात आला होता. जेव्हा आग भडकली त्यावेळी, जळत्या बांबूचा सांगाळा लोकांच्या अंगावर पडल्याची प्राथमिक माहिती आहे. या रेस्टॉरंटचं प्रवेशद्वार अतिशय अरुंद असल्यामुळे लोकांना बाहेर पडण्यास अडथळा निर्माण झाला होता. विशेष म्हणजे ६ ते ७ महिन्यांपूर्वीच वन-अबव्ह सुरु झालं होतं.

कमला मिल कंपाऊंडमधल्या विविध कार्यालयातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. कमलामधील मराठी न्यूज चॅनेल टीव्ही नाईन तसंच झूम, टाईम्स नाऊ, मिरर नाऊ, इटी नाऊ या वृत्तवाहिनीच्या प्रसारणांवरही याचा परिणाम झाला आहे. तसंच अनेक कार्यालय खबरदारीचा उपाय म्हणून आज बंद ठेवण्यात आली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2017 10:12 AM IST

ताज्या बातम्या