कमला मिल आग प्रकरणात वन-अबव्हचे तीनही मालक अटकेत

कमला मिल आग प्रकरणात वन-अबव्हचे तीनही मालक अटकेत

कमला मिल आग प्रकरणात न्यूज 18 लोकमतनं केलेल्या तपासानुसार आज वन-अबव्हच्या सह-मालकाला अभिजीत मानकरलाही पोलिसांनी अटक केली आहे.

  • Share this:

11 जानेवारी : कमला मिल आग प्रकरणात न्यूज 18 लोकमतनं केलेल्या तपासानुसार आज वन-अबव्हच्या सह-मालकाला अभिजीत मानकरलाही पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी आणि वनअबव्हचे मालक जिगर संघवी आणि क्रिपेश संघवी यांना काल रात्री मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आता वन-अबव्हचा सह-मालक अभिजीत मानकरलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या तिघांनाही मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

काल रात्री जिगर संघवी आणि क्रिपेश संघवी दोघे त्यांच्या वकिलाला भेटण्यासाठी जाणार असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. यानुसार सापळा रचून मुंबई पोलिसांनी बांद्रा लिंकिंग रोड परिसरातून या दोघांनाही अटक केली. या तीनही आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी लुकआऊट नोटीस काढली होती.

कमला मिल आग प्रकरणात आतापर्यंत कोणाकोणाला अटक झाली आहे पाहूयात....

31 डिसेंबर 2017

- 'वन अबव्ह'चे व्यवस्थापक लिस्बन आणि केल्वीन यांना अटक

6 जानेवारी 2018

- मोजोसचा मालक युग पाठकला अटक

10 जानेवारी 2018

- विशाल कारियाला संघवी बंधूंना मदत केल्याप्रकरणी अटक

10 जानेवारी 2018

वन अबव्हचे मालक जिगर आणि क्रिपेश संघवी अटकेत

11 जानेवारी 2018

- वन अबव्हचा तिसरा मालक अभिजीत मानकर पोलिसांच्या ताब्यात

- मोजोसचा दुसरा मालक युग तुलीचा शोध सुरु

वन अबव्हचे 3 मालक अटकेत

कशी केली अटक ?

- बुधवारी सकाळी बुकी विशाल कारियाला अटक

- दुपारमध्ये कारियाची कसून चौकशी

- संघवी भावंड रात्री वांद्रे परिसरात येणार, कारियाची माहिती

- एका हॉटेलमध्ये वकिलाला भेटण्यासाठी जाणार होते

- हॉटेलच्या बाहेर पोलिसांनी रचला सापळा

- साध्या गाडीत बसून होते पोलीस

- रात्री 11.30 वा. संघवी भावंडांना अटक

- आज सकाळी ६:३० च्या सुमारास मरीनलाईन परिसरातल्या एक हॉटेलजवळून तिसरा आरोपी अभिजीत मानकरलाही पोलिसांनी घेतलं ताब्यात.

 

First published: January 11, 2018, 8:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading