कमला मिलचा मालक रमेश गोवानीला अटक; मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

कमला मिलचा मालक रमेश गोवानीला अटक; मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

कमला मिल अग्निकांड प्रकरणी कमला मिलचा मालक रमेश गोवानी याला अटक करण्यात आली आहे. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत एन. एम जोशी पोलिसांनी रमेश गोवानीला बेड्या ठोकल्या आहेत.

  • Share this:

23 जानेवारी : कमला मिल अग्निकांड प्रकरणी कमला मिलचा मालक रमेश गोवानी याला अटक करण्यात आली आहे. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत एन. एम जोशी पोलिसांनी रमेश गोवानीला बेड्या ठोकल्या आहेत. मंगळवारी म्हणजेच आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

कमला मिल अग्निकांडप्रकरणात वन अबव्हचे तीन, मोजोसचे दोन आणि एक अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. तसंच कमला मिलच्या एका संचालकालाही यापूर्वीच अटक करण्यात आली होती. कमला मिलमधील अनियमित कामं आणि हलगर्जीपणाचा ठपका या आरोपींवर ठेवण्यात आला आहे.

कमला मिल आग प्रकरणात आतापर्यंत कोणाकोणाला अटक झाली आहे पाहूयात....

31 डिसेंबर 2017

- 'वन अबव्ह'चे व्यवस्थापक लिस्बन आणि केल्वीन यांना अटक

6 जानेवारी 2018

- मोजोसचा मालक युग पाठकला अटक

10 जानेवारी 2018

- विशाल कारियाला संघवी बंधूंना मदत केल्याप्रकरणी अटक

10 जानेवारी 2018

- वन अबव्हचे मालक जिगर आणि क्रिपेश संघवी अटकेत

11 जानेवारी 2018

- वन अबव्हचा तिसरा मालक अभिजीत मानकर पोलिसांच्या ताब्यात

16 जानेवारी 2018

- मोजोसचा दुसरा मालक युग तुली सकाळी पोलिसांना शरण गेला आणि आता त्याला अटक करण्यात आली आहे.

20 जानेवारी 2018

- कमला मिलमधला भागीदार रवी भंडारी, अग्निशमन अधिकारी राजेंद्र पाटील आणि कंत्राटदार विनोद पांडेला मुंबई पोलिसांनी अटक केली.

22 जानेवारी 2018

- कमला मिलचा मालक रमेश गोवानी याला अटक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 23, 2018 09:18 AM IST

ताज्या बातम्या