कमला मिल आग प्रकरणात मोजोस पब मालक युग तुली अटकेत

कमला मिल आग प्रकरणात मोजोस पब मालक युग तुली अटकेत

कमला मिल आग प्रकरणात अखरे 15 दिवसांनंतर आज सकाळी युग तुली पोलिसांना शरण गेला आहे. आणि पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

  • Share this:

मुंबई, 16 जानेवारी : कमला मिल आग प्रकरणात अखरे 15 दिवसांनंतर आज सकाळी युग तुली पोलिसांना शरण गेला आहे. आणि पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गेल्या काही दिवसांआधी युग तुली हैद्राबाद विमानतळावर पत्नीसमवेत सीसीटीव्ही फुटेजमधे दिसला होता. पण तिथून तो फरार झाला.  11 तारखेला पोलिसांनी अभिजीत मानकरच्या मुस्क्या आवळल्या होत्या आणि आज मोजोस रेस्टोबारचा मालक युग तुली पोलिसांना शरण गेला आहे. यानंतर आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

कमला मिल आग दुर्घटनेपासून युग तुली फरार होता. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. 10 तारखेच्या रात्री मुंबई पोलिसांनी आरोपी आणि वनअबव्हचे मालक जिगर संघवी आणि क्रिपेश संघवी दोघांना अटक केली होती. त्याच्याच दुसऱ्या दिवशी 11 तारखेला वन-अबव्हचा सह-मालक अभिजीत मानकरलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आणि आज शरण गेल्यानंतर युग तुलीलाही पोलिसांनी अटक केली आहे. युग तुली हा मोजोस रेस्टोबारचा दुसरा मालक आहे. मोजोसचा पहिला मालक युग पाठकही पोलिसांच्या ताब्यात आहे.

कोण आहे युग तुली ?

- 'मोजोस बिस्त्रो'मधला भागीदार

- तुली हॉस्पिटॅलिटीचा संचालक

- वय - 29 वर्षं

- स्वित्झर्लंडमधून हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण

- स्वित्झर्लंडमध्ये डीजे म्हणूनही काम केलं

- तुली परिवार नागपूरस्थित

- उद्योजक प्रिन्स तुलीचा पुतण्या

- तुली परिवार हॉटेल आणि वाहतूक व्यवसायातलं बडं प्रस्थ

कमला मिल आग प्रकरणात आतापर्यंत कोणाकोणाला अटक झाली आहे पाहूयात....

31 डिसेंबर 2017

- 'वन अबव्ह'चे व्यवस्थापक लिस्बन आणि केल्वीन यांना अटक

6 जानेवारी 2018

- मोजोसचा मालक युग पाठकला अटक

10 जानेवारी 2018

- विशाल कारियाला संघवी बंधूंना मदत केल्याप्रकरणी अटक

10 जानेवारी 2018

- वन अबव्हचे मालक जिगर आणि क्रिपेश संघवी अटकेत

11 जानेवारी 2018

- वन अबव्हचा तिसरा मालक अभिजीत मानकर पोलिसांच्या ताब्यात

16 जानेवारी 2018

- मोजोसचा दुसरा मालक युग तुली सकाळी पोलिसांना शरण गेला आणि आता त्याला अटक करण्यात आली आहे.

First published: January 16, 2018, 8:39 AM IST

ताज्या बातम्या