कमला मिल आग प्रकरणात मोसोजच्या मालकाला अटक

कमला मिल आग प्रकरणात मोसोजच्या मालकाला अटक

युग पाठक असं या मालकाचं नाव आहे. आत्तापर्यंतच्या तपासाअंती युग पाठकला अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

06 जानेवारी, मुंबई : कमला मिल आग प्रकरणात मोसोज बार मालकाला अटक करण्यात आली आहे. युग पाठक असं या मालकाचं नाव आहे. आत्तापर्यंतच्या तपासाअंती युग पाठकला अटक करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईहून मोसोजचा मालक युग पाठकला पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.

कमला मिल आग दुर्घटना प्रकरणी लागलेल्या आगीचा अहवाल अग्निशामन दलानं महापालिका आयुक्तांना दिला होता. त्यानंतर या गुन्ह्यामध्ये मोजोसचे मालक युग पाठक आणि युग तुलीचं यांची नावं समाविष्ट करण्यात आली होती. त्यातल्या युग पाठकला  मुंबई पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.

कोण आहे युग पाठक?

- युग निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा

- युगचं शिक्षण पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयात

- युगला नाईटलाईफचं प्रचंड आकर्षण

- युगचा एक पार्टनर प्रसिद्ध गायकाचा मुलगा

- दुसरा पार्टनर नागपूरच्या प्रसिद्ध व्यवसायिकाचा मुलगा

कमला मिलमधली आग पहिल्यांदा मोजोसला लागल्याचं स्पष्ट झालं होतं. तसा व्हिडिओही व्हायरल झाला होता. अग्निशमन दलाच्या अहवालानुसार हॉटेलमधल्या हुक्काच्या ठिणगीमुळेच आग लागल्याचं स्पष्ट झालं होतं.

हुक्क्यात वापरण्यात येणारा कोळसा आणि त्यामधून निघणाऱ्या ठिणग्या या मोजोस हॉटेल्सचा मोठ्या पडद्याला लागल्या. याने पडद्याला लागलेली आग छातामार्गे वन अबवमध्ये देखील पसरली, असा निष्कर्ष या अहवालात मांडण्यात आला होता.

वन अबव हॉटेल्सच्या छाताला आगीने वेढल्यामुळे छताचे काही भाग जमिनीवर पडले. त्यामुळे आत अडकलेल्या लोकांना बाहेर पडण्यास अडथळा निर्माण झाला. यामुळे काही जण आपला जीव वाचवण्यासाठी शौचलयात लपले. मात्र त्यांचाही गुदमरून मृत्यू झाला.

या आगी प्रकरणात अनेकांनी आपला जीव गमावला. त्यामुळे अखेर कसून तपास केल्यानंतर अग्निशमन दलाच्या अहवालानंतर पोलीसांकडून मोसोजच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.

First published: January 6, 2018, 5:29 PM IST

ताज्या बातम्या