कल्याणमध्ये ५ रुपयांसाठी एसटी कंडक्टरला मारहाण

कल्याणमध्ये ५ रुपयांसाठी एसटी कंडक्टरला मारहाण

अचानक प्रवाशानं नितीन यांच्याशी हुज्जत घालायला सुरूवात करत त्यांना अक्षरशः लाथा- बुक्यांनी मारलं

  • Share this:

कल्याण, ०६ ऑक्टोबर २०१८-  कल्याणमध्ये ५ रुपयांसाठी एसटी कंडक्टरला मारहाण करण्यात आली आहे. कल्याण- मुरबाड एसटी बसमध्ये हा प्रकार घडला. नितीन खंडागळे असं या कंडक्टरचं नाव असून, पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. आज सकाळच्या सुमारास कल्याणहून मुरबाडला जाणाऱ्या एसटी बसमध्ये हा प्रकार घडला. ही बस कल्याण एसटी डेपोतून सुटल्यानंतर कंडक्टर नितीन खंडागळे हे तिकीट वाटत होते. यावेळी एका प्रवाशाला तिकिटातून उरलेले ५ रुपये देण्यासाठी त्यांच्याकडे सुट्टे नव्हते. त्यामुळे सुट्टे झाल्यावर देतो, असं म्हणून ते पुढे निघाले.

मात्र यावेळी या प्रवाशानं त्यांच्याशी हुज्जत घालत त्यांना लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार पाहून एसटी चालकाने एसटी बस सरळ पोलीस ठाण्याबाहेर आणून उभी केली आणि पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी कंडक्टरला मारहाण करणाऱ्या दोन प्रवाशांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी कंडक्टर नितीन खंडागळे यांनी केली आहे.

गडकरी म्हणतात, 'पवारसाहेब कधी काय बोलतील आणि काय करतील याचा नेम नाही'

First published: October 6, 2018, 10:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading