कल्याण- डोंबिवली लेप्टोच्या आजाराने चौघांचा मृत्यू

कल्याण- डोंबिवली लेप्टोच्या आजाराने चौघांचा मृत्यू

जुलैमधील मुसळधार पावसानानंतर कल्याण डोंबिवलीत साथीच्या आजारांनी हात पाय पसरण्यास सुरुवात केली

  • Share this:

कल्याण डोंबिवलीत महिनाभरापासून साथीच्या आजारानी डोकं वर काढलंय. लेप्टोनंही शिरकाव केल्यामुळे या आजाराने आतापर्यंत  ४ बळी गेलेत. डेंग्यू आणि लेप्टोचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आरोग्य विभागाने ठोस उपाययोजना हाती घेतल्या आहेत, अशी माहिती डॉ. राजू लवांगरे, पालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी दिली. साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी आणि या रोगांचा फैलाव वाढू नये यासाठी आरोग्य विभाग ऑन ड्युटी असून घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करत आहेत. कल्याण आणि डोंबिवलीतील प्रत्येकी एक रुग्णालय, चार आरोग्य केंद्र आणि १३ उपकेंद्रांमध्ये साथ रोग प्रतिबंधक कक्ष सुरु करण्यात आला आहे.

जुलैमधील मुसळधार पावसानानंतर कल्याण डोंबिवलीत साथीच्या आजारांनी हात पाय पसरण्यास सुरुवात केली. पाऊस थांबल्यानंतर वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजारांनी ङोके वर काढले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने साथीच्या आजारांपासून संरक्षण व्हावे यासाठी लसीकरण, जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. मात्र कल्याण रेल्वे स्थानकात रोज हजारो प्रवासी राज्यभरातून आणि देशभरातून येतात. यामुळे संसर्गजन्य रोग पसरत असून, कावीळ, गैस्ट्रो, मलेरिया, डेंग्यूबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. पालिकेच्या विविध रुग्णालयात संशयीत रुग्णांवर उपचार सुरु आहेत. लेप्टोमुळे तीन रुग्ण दगावल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरु केले आहे. या सर्वेक्षणात कल्याण पूर्व नेतीवली येथील ज्योती यादव या १४ वर्षांच्या मुलीचा लेप्टोमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय ३ रुग्ण लेप्टोमुळे दगावले आहेत.

आजरनिहाय उपचार घेत असलेले रुग्ण ( १ जून ते ५ सप्टेंबर )

गैस्ट्रो -१८९ ,

लेप्टो - ९ ,

काविळ - १६५,

टायफाइड - ३१७,

मलेरिया - १४५,

डेंग्यू - ४३९,

ताप - १६९४३

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2018 09:01 AM IST

ताज्या बातम्या