Home /News /mumbai /

आधी ती पोटभर जेवली, पार्सलही घेतलं आणि नंतर घातला राडा..!!

आधी ती पोटभर जेवली, पार्सलही घेतलं आणि नंतर घातला राडा..!!

कल्याण, 27 सप्टेंबर : शहरातील स्टेशन परिसरात मद्यपान केलेल्या दोन तरुणींनी राडा घातल्याची घटना ताजी असतानांच भिवंडी शहरातील हॉटेलमध्ये जेवणाचं बिल न भरता एका महिलेने राडा घातल्याचा व्हिडियो व्हायरल झालाय.

    कल्याण, 27 सप्टेंबर : शहरातील  स्टेशन परिसरात मद्यपान केलेल्या दोन तरुणींनी राडा घातल्याची घटना ताजी असतानांच भिवंडी शहरातील हॉटेलमध्ये जेवणाचं बिल न भरता एका महिलेने राडा घातल्याचा व्हिडियो  व्हायरल झालाय. जेंव्हा या वायरल व्हिडियोची पडताळणी केली असता, व्हिडियो मध्ये दिसणाऱ्या महिलेचं नाव सलमा ईमानुलहक अन्सारी (वय ३४)असून शहरातील आजमीनगर या परिसरात ती राहते. तसेच  सिद्दिक फक्की नावाचा पुरुष हा या महिलेचा साथीदार आहे. हे दोघे भिवंडी शहरातील विविध हॉटेलात जाऊन पहिले तर पोटभर जेवण करतात आणि पार्सलही घेतात आणि त्यानंतर मात्र ज्या वेळी बिल भरण्याची वेळ येते त्यावेळी ही महिला स्वतःला पोलीस किंवा फूड डिपार्टमेंटची ऑफिसर असल्याचे सांगून जेवणाच्या बिलावरून हॉटेल कर्मचाऱ्यांशी राडा घालत असल्याची बाब स्पष्ट झाली. भिवंडी शहरातील बारादरी हॉटेलात सलमा व तिचा साथीदार सिद्दिक फक्की आम जनतेप्रमाणेच  हॉटेलमध्ये दाखल झाले. मेनूकार्ड बघून जेवणाचा ऑर्डर दिली. पोटभर जेवणही केलं, पार्सल साठी चिकन मलाई बॉन्डलेस व बिर्याणीचे ऑर्डरहि दिले. जेव्हा ११00 रुपये बिल हातात आलं, तेव्हा यांनी आम्ही फूड ऑफिसर असल्याचे सांगत फूड चेकिंग करता आलो आहोत. तुम्ही बिलामध्ये वाढ करून जनतेची फसवणूक करता असे सांगून बिल भरण्यास नकार दिला. हॉटेलच्या मेनेजरने त्यांना बिल भरण्यास सांगितले मघ काय या महिलेने पूर्ण हॉटेल डोक्यावर घेतलं. दरम्यान, हॉटेलच्या मॅनेजरशी तीने तासभर राडा घातला. महिला बिल भरत नसल्याचे पाहून मेनेजर ने स्थानीय पोलीस स्टेशनला या घटने  संदर्भात माहिती दिली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि या महिलेस आणि तीच्या साथीदाराला निजामपुरा पोलीस ठाण्यात घेऊन गेले. या आधीसुद्धा या दोघांनी शहरातील रिजेंड हॉटेलमध्ये अशापद्धतीने राडा घातला होता. निजामपूर पोलीस ठाण्यात गेल्यावर या त्या दोघांनी माफी मांगीतली. दरम्यान, हॉटेलात महिलेने केलेल्या राड्याचा व्हिडियो एका ग्राहकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद करून सोशल मिडियावर व्हायरल केलाय. भिवंडी शहरातील पोलिसांनी अश्या फसवणूक करणाऱ्या टोळीपासून सावध राहण्यास सांगितले तर अश्या टोळीची माहिती किंवा ज्यावर संशय असेल तर त्यांची माहिती तात्काळ स्थानीय पोलिसांना द्यावी असे आव्हाहन पोलिसांकडून  करण्यात आले आहे.  अडीच वर्षाच्या चिमुरडीचे भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके
    First published:

    Tags: Bhivandi, Food officer, Hotel, Kalyan, Rada, Woman, एका महिलेने, कल्याण, जेवण, भिवंडी, राडा घातला, हॉटेल

    पुढील बातम्या