Home /News /mumbai /

Kalyan News : क्रिकेट खेळताना बॉल उचलायला गेला, रिव्हर्स येणारा मनपाचा डम्पर अंगावरून गेला, 12 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

Kalyan News : क्रिकेट खेळताना बॉल उचलायला गेला, रिव्हर्स येणारा मनपाचा डम्पर अंगावरून गेला, 12 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

Kalyan Accident news मित चेंडू घेण्यासाठी खाली वाकला त्याचवेळी डम्पर चालक दीपक थेब्रे याने वेगाने डम्पर रिव्हर्स म्हणजे मागे घेतला. मागे कोणी आहे किंवा नाही याची खातरजमा न करताच त्यानं वेगात डम्पर मागे घेतला असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

पुढे वाचा ...
    कल्याण, 22 मे : कल्याणमध्ये (Kalyan Accident news) एका दुर्दैवी घटनेमध्ये 12 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू (12 year old boy died) झाला आहे. मित्रांबरोबर खेळत असताना बॉल रस्त्यावर गेला. तो बॉल उचलत असताना महानगर पालिकेच्या रिव्हर्स येत असलेल्या डंपरची धडक बसली आणि त्याच्या चाकाखाली आल्याने या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून. बेजबाबदारपणे डम्पर चालणाऱ्या चालकाच्या विरोधात संतापही व्यक्त केला जात आहे. (वाचा- वडिलांचं निधन झाल्यानंतर आता काकाने केला आईचा खून, चिमुरड्याचं आयुष्य उद्ध्वस्त) कल्याण पूर्वेतील कचोरे येथील गावदेवी मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. कचोरे गावदेवी मंदिर परिसरात उर्मिला धाकड त्यांच्या चार मुलांसह राहतात. उर्मिला यांच्या पतीचं 5 वर्षापूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर मोठा मुलगा रोहन आणि उर्मिला या कष्टाने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत मुलांचा सांभाळ करत आहेत. उर्मिला यांचा 12 वर्षाचा धाकटा मुलगा अमित शनिवारी मित्रांबरोबर गावदेवी मंदिर परिसरात क्रिकेट खेळत होता. यावेळी मुलांबरोबर खेळत असताना मारलेला चेंडू त्याच्या हातात येण्याऐवजी रस्त्याच्या कडेला गेला. (वाचा-प्रेमविवाहानंतर गर्भपात न केल्यानं महिलेवर अत्याचार; बलात्काराचा गुन्हा दाखल) हातातून सुटलेला चेंडू आणण्यासाठी अमित रसत्याच्या जवळ गेला. पण त्याचवेळी त्याठिकाणी कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाचा डम्पर आलेला होता. तो डम्पर त्याचठिकाणी रिव्हर्स येत होता. अमित चेंडू घेण्यासाठी खाली वाकला त्याचवेळी डम्पर चालक दीपक थेब्रे याने वेगाने डम्पर रिव्हर्स म्हणजे मागे घेतला. मागे कोणी आहे किंवा नाही याची खातरजमा न करताच त्यानं वेगात डम्पर मागे घेतला असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. त्यामुळं डम्परची धडक अमितला लागली आणि अमित खाली पडला आणि डम्परच्या चाकाखाली आला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे अमितच्या मित्रांनी आरडा ओरडा केला. त्यानंतर डम्पर चालकाने त्याला घेऊन रुग्णालय गाठलं. मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता. डॉक्टरांनी अमितला तपासून तो मृत असल्याचं जाहीर केलं. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी डम्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अशा बेजबाबदार चालका विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी अमितच्या नातेवाईकांनी केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Accident, Kalyan

    पुढील बातम्या