मुंबई, 03 नोव्हेंबर : दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये (Daddra Nagar Haveli Loks Sabha bypolls result) शिवसेनेनं (shivsena) भाजपला (bjp) धूळ चारली आहे. या शानदार विजयानंतर विजयी उमेदवार कलाबेन डेलकर (kalaben delkar) आणि त्यांचा मुलगा अभिनव डेलकर (abhivav delkar) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांची भेट घेतली. 'आम्ही ही लढाई जिंकली आहे, माझे वडील मोहन डेलकर हे हुकूमशाहीच्या विरोधात होते. अभी तो ये शुरूआत है' असं म्हणत अभिनव डेलकर यांनी भाजपवर निशाणा साधला.
दादरा नगर हवेली लोकसभा पोट निवडणुकीत भाजपच्या उमेदवराचा दारुण पराभव करत शिवसेनेचा भगवा फडकवणाऱ्या कलाबेन डेलकर यांनी आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवास्थानी भेट घेतली. महाराष्ट्राबाहेर पहिला खासदार निवडुन आल्यामुळे शिवसेनेत उत्साह संचारला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत वर्षा निवास्थानी शिवसेना विजयी जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत हे देखिल उपस्थित आहेत.
या भेटीनंतर कलाबेन डेलकर आणि अभिनव डेलकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला.
'दादरा नगर हवेलीमध्ये जनतेनं आशिर्वाद दिला आहे. आम्हाला जेवढी अपेक्षा नव्हती त्यापेक्षा जास्त यश मिळालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धन्यवाद बोलण्यासाठी आले होते. मुख्यमंत्री लवकरच दादरा नगर हवेलीत विजयी सभा घेण्यासाठी येणार आहे, अशी माहिती कलाबेन डेलकर यांनी दिली.
भयंकर! जॉगिंगला गेलेल्या तरुणीचे भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके, वेदनेनं झाला मृत
तर, हा एक ऐतिहासिक व लोकशाहीचा विजय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमच्यासोबत आहेत. भाजपचे बडे नेते प्रचारासाठी आले होते. परंतु, हा प्रदेशचा प्रश्न होता. आम्हाला 30-35 हजार मतांनी विजयी होण्याची अपेक्षा होती. इतक्या मोठ्या विजयाची अपेक्षा नव्हती' असं अभिनव डेलकर म्हणाले.
G. H. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट जळगाव इथे 28 जागांसाठी भरती
तसंच, 'आता आमच्यामागे 22 शिवसेना खासदारांची ताकद मिळेल. हुकूमशाहीच्या विरोधात माझे वडील होते.अभी तो ये शुरूआत है. गुजरातमध्ये व दमणमध्येही पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार' असंही अभिनव डेलकर यांनी सांगितलं.
कलाबेन डेलकर यांचा दणदणीत विजय
शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी तब्बल 51009 मतांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत कलाबेन देलकर यांना एकूण 1,12741 मते मिळाली तर विरोधात असलेले भाजपचे उमेदवार महेश गावित (BJP Mahesh Gavit) यांना 63,382 मते मिळाली. या निवडणूक निकालामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. या विजयामुळे आता महाराष्ट्राचा खासदार विजयी झाला आहे. तसेच शिवसेनेने आता महाराष्ट्राच्या बाहेर आता वाटचाल सुरू केली असल्याचं दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.