हा मराठमोळा नेता 'काँग्रेस' सोडणार? 'ट्विटर' अकाउंटवरून हटवले पक्षाचे नाव

हा मराठमोळा नेता 'काँग्रेस' सोडणार? 'ट्विटर' अकाउंटवरून हटवले पक्षाचे नाव

महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा तिढा आणखीच गुंतागुंतीचा झाला असताना मध्य प्रदेशच्या राजकारणात कुजबूज सुरू झाली आहे.

  • Share this:

मुंबई,25 नोव्हेंबर: महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा तिढा आणखीच गुंतागुंतीचा झाला असताना मध्य प्रदेशच्या राजकारणात कुजबूज सुरू झाली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सगळ्यांना गोंधळात टाकले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून पक्षाचा उल्लेख काढला आहे. पक्षाच्या जागेवर 'समाजसेवक आणि क्रिकेटप्रेमी' (Public Servant, cricket enthusiast) असा उल्लेख केल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया आता 'काँग्रेस' सोडणार का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सरकारच्या कार्यशैलीवर नाराज..

ज्योतिरादित्य सिंधिया मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना वारंवार पत्र लिहून सरकारच्या कार्यशैलीवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यात आता ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून पक्षाचा उल्लेख काढल्याने उलटसूलट चर्चा सुरू झाली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया लवकरच भाजपच्या गोटात सामील होणार असल्याच्या चर्चेलाही अक्षरश: उधाण आले आहे.

सिंधियांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले 4 पत्रे..

ज्योतिरादित्य सिंधिया हे मध्य प्रदेश सरकारच्या कार्यशैलीवर नाराज आहेत. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना गेल्या ऑक्टोबर महिन्यात 4 पत्रे लिहिली होती. त्यात त्यांनी राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि राज्यातील रस्त्यांची डागडुजी करण्याची सूचना केली होती. एवढेच नाही तर नोव्हेंबरमध्येही सिंधिया यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून दातिया येथील नागरिकांच्या समस्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.

मध्य प्रदेशात कोणतेही मोठे पद नाही

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला. निवडणुकीनंतर ज्योतिरादित्य यांना मुख्यमंत्रपदाचा दावेदार मानले जात होते. मात्र, राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य यांना डावलून पक्षाचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लावली. यामुळे ज्योतिरादित्य यांचे समर्थक नाराज झाले. त्याचप्रमाणे काँग्रेस प्रदेशाध्यपदी त्यांची निवड करावी, अशी जोरदार मागणी होत असताना हायकमांडने अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 25, 2019 11:54 AM IST

ताज्या बातम्या