ज्योतिरादित्यनंतर महाराष्ट्रातला राहुल गांधींचा विश्वासूही नेताही भाजपच्या वाटेवर?

ज्योतिरादित्यनंतर महाराष्ट्रातला राहुल गांधींचा विश्वासूही नेताही भाजपच्या वाटेवर?

काँग्रेसमध्ये तरुण आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये संघर्ष पेटला आहे. ज्या नेत्यांमुळे पक्षाची ही अवस्था झाली त्या नेत्यांनी दूर झालं पाहिजे असं राहुल गांधी यांना वाटत होतं मात्र जुने लोक पदं सोडायला तयार नाहीत.

  • Share this:

मुंबई 10 मार्च : ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा हादरा बसला. मध्यप्रदेशात शिंदे घराण्याची एक वेगळी प्रतिष्ठा असल्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय. शिंदे यांच्या या बंडामुळे मध्यप्रदेशातलं कमलनाथ सरकार अल्पमतात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून ज्योतिरादित्य हे नाराज होते. पक्षात आपल्याला डावललं जातंय, काम करू दिलं जात नाही अशी त्यांची भावना होती. त्यामुळे त्यांनी थेट भाजपचा रस्ता धरला. आता त्याचे पडसाद  महाराष्ट्रातही उमटण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवराही गेल्या काही महिन्यांपासून पक्षात नाराज आहेत. ज्योतिरादित्य यांच्याप्रमाणेच मिलिंद देवरासुद्धा राहुल गांधी यांच्या आतल्या वर्तुळातले होते. समवयस्क असल्याने त्यांचं राजकारणापलिकडचं नातं होतं. राहुल यांच्या अनेक विदेश दौऱ्यांमध्ये मिलिंद देवरा हे त्यांच्यासोबत होते. मात्र आता संदर्भ बदलल्याने काँग्रेसला आणखी हादरे बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पद सोडलं होतं. त्यानंतर सोनिया गांधी पुन्हा एकदा पक्षाध्यक्ष झाल्या. त्यानंतर पक्षात तरुण आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये संघर्ष पेटला आहे. ज्या नेत्यांमुळे पक्षाची ही अवस्था झाली त्या नेत्यांनी दूर झालं पाहिजे असं राहुल गांधी यांना वाटत होतं मात्र जुने लोक पदं सोडायला तयार नव्हते.

मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होतं. तर त्यांच्या एका ट्वीटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उत्तर दिलं होतं. त्यामुळे आता मिलिंद देवराही भाजपची वाट धरणार असल्याची चर्चा सुरू झालीय.

ज्योतिरादित्यांचा थाट : 400 खोल्यांचा पॅलेस, जेवण वाढण्यासाठी चांदीची ट्रेन

मध्यप्रदेशातलं काँग्रेसचं कमलनाथ सरकार संकटात सापडलं आहे. पक्षाचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर पक्षाच्या 20 आमदारांनीही राजीनामा दिलाय. त्यामुळे सरकार अल्पमतात आलं आहे. या आधीही ज्योतिरादित्य शिंदे यांना मानणाऱ्या काही मंत्री आणि आमदारांनी राजीनामा दिला होता. ते मंत्री आणि आमदार बंगळुरमध्ये असल्याचं बोललं जातं आहे. भाजपचे पक्ष प्रभारी खासदार विनय सहस्त्रबुद्धे हे तातडीने भोपाळमध्ये दाखल झाले आहेत.

मध्य प्रदेशात सरकार वाचवण्यासाठी कमलनाथ यांची खटपट, 6 बंडखोरी मंत्र्यांना हटवणार

तर दिल्लीतून तातडीने भोपाळमध्ये दाखल झालेले मुख्यमंत्री कमलनाथ हे डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करत आहेत. मात्र परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेल्याचा अंदाज राजकीय क्षेत्रात व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मध्यप्रदेशात कमळ फुलणार असल्याचं संकेत मिळत आहे.

‘या’ आहेत ज्योतिरादित्य यांची पत्नी, 50 सुंदर महिलांमध्ये झाला होता समावेश

गेल्या काही महिन्यांपासून नाराज असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांनी राजीनामा पाठवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. देशभर रंगोत्सवाची धूम असताना दिल्लीत राजकीय वातावरण तापलं आहे. मध्यप्रदेशातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.

 

 

 

First published: March 10, 2020, 4:26 PM IST

ताज्या बातम्या