पॉप स्टार जस्टिन बिबरच्या काॅन्सर्टला तुफान गर्दी, तरुणाईला केलं घायाळ

पॉप स्टार जस्टिन बिबरच्या काॅन्सर्टला तुफान गर्दी, तरुणाईला केलं घायाळ

  • Share this:

11 मे : कॅनडाचा अवघा 23 वर्षांचा पॉप स्टार जस्टिन बिबर याच्या काल रात्री मुंबईत आयोजित लाइव्ह कॉन्सर्टला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जस्टिन बिबरच्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर तरूणाईने मोठी गर्दी केली आहे. पॉपस्टार जस्टिनचा भारतातला हा पहिलाच कार्यक्रम असल्यामुळे तब्बल पन्नास हजाराहूंन अधिक बिलिबर्स (जस्टीन बिबरचे चाहते) या कॉन्सर्टमध्ये गर्दी केली होती.

भारतीय लोक सर्वात जास्त उत्साही आहेत, माझ्यासाठी ही एक विस्मरणीय रात्र आहे, असं यावेळी जस्टिन म्हणाला.

पर्पज या आपल्या नव्या आल्बमला प्रमोट करण्यासाठी जस्टिन सध्या वर्ल्ड टूरवर निघाला आहे. जस्टिनची जादू अनूभवण्यासाठी लोकांनी सकाळी अकरापासून कॉन्सर्टस्थळी गर्दी करायला सुरूवात केली. डीजे झेदेनने कॉन्सर्टची सुरुवात केली.

२३ वर्षांचा जस्टीन बिबर प्रथमच भारतात, तेही मुंबईत परफॉर्म करणार असल्याने मुंबई, ठाणेसह पुणे, नाशिक, नागपूरमधून चाहते आले होते. या काॅन्सर्टला प्रवेश मिळण्यासाठी तब्बल 4 हजारांपासून ते 75 हजारांपर्यंत तिकीट दर होती. पण, इतका तिकीटदर असूनही लोकांनी या काॅन्सर्टला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

संध्याकाळी चार वाजताच विशेष हेलिकॉप्टरने दाखल झालेला जस्टीन स्टेजवर मात्र सव्वा आठ वाजता आला. व्हाइट टीशर्ट, नेव्ही ब्लू कलर्सची तीन स्ट्रीप्स असलेली हाफ पॅन्ट आणि स्पोर्टस् शूज घालून जस्टीन स्टेजवर अवतरला. एकामागोमाग एक गाणी गात असताना पउपस्थितांमध्ये तरुणींमध्ये उन्मादामुळे बेशुद्ध होण्याचे प्रकारही घडले. ‘सॉरी’ या त्याच्या प्रचंड लोकप्रिय गाण्याने दोन तासांनी ही कॉन्सर्ट संपली.  जस्टिन बीबरने यावेळी अल्बम 'पर्पज', 'व्हाट डू यू मीन', 'लाइफ इज वर्थ लिव्हिंग', 'बेबी', 'लेट मी लव यू', चिल्ड्रन, एज लॉन्ग एज यू लव मी, 'होल्ड टाइट', 'नो सेंस', 'कंपनी', 'बीन यू', 'ब्वॉयफ्रेंड', 'द फीलिंग', 'व्हेयर आर यू' आणि 'मार्क माई वर्ड्स' या गाण्यांवर परफॉर्म केले.

आदित्य ठाकरेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीजनाही जस्टिनची भुरळ

'पर्पज' या आपल्या नव्या आल्बमसाठी सुरू केलेल्या दौऱ्याच्या निमित्ताने प्रथमच भारतात आणि तेही मुंबईत आलेल्या आणि तमाम तरुणाईचं लक्ष लागलेल्या जस्टीन बिबरच काल काॅन्सर्ट तितकाच देखणा झाला.

कॉन्सर्टपूर्वी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जस्टीनची भेट घेतली. त्याशिवाय अरबाझ खान, मलायका अरोरा-खान, आलिया भट, अक्षय कुमार, सोनाली बेंद्रे यासारख्या बॉलिवूडचे सिताऱ्यांनीही जस्टीनच्या गाण्यांवर भान हरपून ठेका धरला.

जस्टिनला पाहण्याच्या उत्सुकतेने 50 चाहते बेशुद्ध

दरम्यान, इंडियन्स एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये जस्टिन बिबरला पाहण्याच्या उत्सुकतेने 50 चाहते बेशुद्ध पडल्याची माहिती आहे. त्यांना प्रथोमपचार देण्यात आले आहेत.

First published: May 11, 2017, 9:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading