दुसऱ्या राज्यात बदली नको म्हणून मुंबई हायकार्टाच्या सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्तींचा राजीनामा

दुसऱ्या राज्यात बदली नको म्हणून मुंबई हायकार्टाच्या सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्तींचा राजीनामा

दुसऱ्या राज्यात पदोन्नतीने बदली झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी राजीनामा दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 14 फेब्रुवारी - मुंबई हायकार्टाचे (Bombay High court) दुसरे सगळ्यात ज्येष्ठ न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी (Justice Satyaranjan Dharmadhikari) यांनी राजीनामा दिला आहे. दुसऱ्या राज्यात पदोन्नतीने बदली झाल्यानं त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं. आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे त्यांना महाराष्ट्र सोडणं शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "त्यांना दुसऱ्या एका राज्यात हायकोर्टाचे मुख्य न्यायाधिश म्हणून पदोन्नती देण्यात आली होती. मात्र सध्या मुंबई सोडायला आपण तयार नसल्याचं त्यांनी सांगितलं."

न्यायमूर्ती धर्माधिकारी (Justice Satyaranjan Dharmadhikari) यांनी सांगितलं की, "मी वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांसाठी राजीनामा दिला आहे. मला मुंबई सोडणं शक्य नाही. आणि ते मला मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशपदावर पदोन्नती द्यायला तयार नव्हते. त्यामुळे मी गुरूवारी संध्याकाळी राष्ट्रपतींना राजीनामा पाठवल्याचं त्यांनी सांगितलं."

शुक्रवारी माझा शेवटचा दिवस

आतापर्यंत हे स्पष्ट झालेलं नाही की राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती धर्माधिकारी यांचा राजीनामा स्विकारला आहे किंवा नाही. मात्र न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी शुक्रावारी वकिलांशी बोलताना सांगितलं की, "हा आपला न्यायालयातील शेवटचा दिवस आहे आणि ते सोमवारी 17 फेब्रुवारीपासून कोर्टात येणार नाहीत." न्यायमूर्ती धर्माधिकारी 2 वर्षांनंतर सेवानिवृत्त होणार होते. न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी सांगितलं की, "मुंबईमध्ये माझ्या काही व्यक्तिगत जबाबदाऱ्या आहेत. आणि त्यामुळेच मी महाराष्ट्राबाहेरील बदली स्विकारू शकत नाही."

शुक्रवारी सकाळी जेव्हा अधिवक्ता मॅथ्यू नेदमपारा यांनी एका याचिकेवर तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात पुढच्या आठवड्याची तारीख मागितली तेव्हा न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी आपण राजीनामा दिल्याची घोषणा केली. न्यायमूर्ती धर्माधिकारी न्यायालयात म्हणाले की, मी राजीनामा दिला आहे. आज इथं माझा शेवटचा दिवस आहे. अधिवक्ता नेदमपार यांनी नंतर सांगितलं की, जेव्हा न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं तेव्हा मला वाटलं की ते सहज बोलत असतील. ते एक वरिष्ठ न्यायाधीश आहेत. त्यांच्या राजीनाम्याबद्दल ऐकून धक्का बसला.

न्यायमूर्ती धर्माधिकारी यांना 14 नोव्हेंवर 2003 साली मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. आणि ते 2022 मध्ये सेवानिवृत्त होणार होते.

मुजरा! राज्यभरात व्हायरल होतंय हे TikTok Whatsapp status

'सविताभाभी'ची चर्चा संपली आता हे 'सॉरी अप्पू' कोण? पुण्यात पुन्हा पोस्टरबाजी

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2020 09:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading