मैदानात जिंकला पण जीवनात हरला! नोकरी नाही म्हणून 'ज्युनियर महाराष्ट्र श्री'ची आत्महत्या

मैदानात जिंकला पण जीवनात हरला! नोकरी नाही म्हणून 'ज्युनियर महाराष्ट्र श्री'ची आत्महत्या

गेल्या काही दिवसांपासून नोकरी नसल्यामुळं अली नैराश्येत होता. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास घरात कोणी नसताना अलीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

  • Share this:

विरार, 01 फेब्रुवारी : 'ज्युनियर महाराष्ट्र श्री'चा बहुमान जिंकलेल्या विरारच्या शरीरसौष्ठवपटूने राहत्या घरी आत्महत्या केली. शुक्रवारी ही धक्कादायक घटना घडली. अली सलोमानी असे या शरीरसौष्ठवपटूचे नाव असून गेले कित्येक महिने नोकरी नसल्याच्या नैराश्यातून त्यानं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

शरीरसौष्ठवपटू अली सलोमनी विरार पूर्वेकडील शिवलीला इमारतीत राहत होता. गेल्या काही दिवसांपासून नोकरी नसल्यामुळं अली नैराश्येत होता. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास घरात कोणी नसताना अलीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. अलीच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन विरार पश्चिम उप जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.अली सलोमनी याने तीन वेळा ‘वसईश्री’ ही स्पर्धा जिंकली आहे.

वाचा-सुट्टी कसली घेता? झेपत नसेल तर खुर्ची सोडा, निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

वाचा-VIDEO : मुलीला बॅकसीटवर बसवून तरुणाची हिरोगिरी, बसला ओव्हरटेक करायला गेला आणि...

तर त्याचबरोबर एकदा ‘दहिसरश्री’ आणि ‘ज्युनियर महाराष्ट्रश्री’ या स्पर्धांचा किताब पटकावला होता. विरारमध्येच गेल्या अनेक वर्षांपासून अली अनेक तरुणांना शरीरसैष्ठ स्पर्धेसाठी मार्गदर्शन करत होता. मात्र उदरनिर्वाहासाठी नोकरी मिळत नसल्याचे आर्थिक अडचणींना अलीला सामोरे जावे लागत होता. यातूनच त्याने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. अलीच्या आत्महत्येमुळे बॉडिबिल्डर क्षेत्रातील मुलांसह परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे.

वाचा-Facebook वर दिसणाऱ्या अ‍ॅडमुळे हैराण आहात; झुकरबर्ग म्हणतोय, या स्टेप्स करा फॉलो

वाचा-सरकारी बँकांनी करदात्यांना केलं कंगाल, एका वर्षात बुडाले 99 हजार कोटी रुपये

First published: February 1, 2020, 9:23 AM IST
Tags:

ताज्या बातम्या