Home /News /mumbai /

BREAKING: तयारीला लागा! राज्यात 7 हजार जागांसाठी होणार जम्बो पोलीस भरती

BREAKING: तयारीला लागा! राज्यात 7 हजार जागांसाठी होणार जम्बो पोलीस भरती

 सरकारने आपल्या रक्षकांसाठी चांगले घरं निर्माण करण्यासाठी काम हाती घेतले पाहिजे, अशी सूचना शरद पवार यांनी सरकारकडे केली होती.

सरकारने आपल्या रक्षकांसाठी चांगले घरं निर्माण करण्यासाठी काम हाती घेतले पाहिजे, अशी सूचना शरद पवार यांनी सरकारकडे केली होती.

पोलीस कॉन्स्टेबलपदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

    विशाल पाटील, प्रतिनिधी मुंबई, 19 मे : राज्य सरकारने (mva government) आता पुन्हा एकदा पोलीस भरतीची (maharshtra police recruitment) तयारी सुरू केली आहे. राज्यात लवकरच 7 हजार पदांची मेगाभरती होणार आहे. या भरती प्रक्रियेनंतर आणखी एक जम्बो पोलीस भरती होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबईत बीडीडी चाळमधील पोलीस वसाहतीत पोलिसांना ५० लाखांत घर देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्य सरकारने पोलीस भरतीची घोषणा केली आहे. राज्यात लवकरच तब्बल 7 हजार पदांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे. पोलीस कॉन्स्टेबलपदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पहिल्या टप्प्यात 7 हजार पदांच्या भरती प्रक्रियेनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबईत पोलिसांना मिळणार ५० लाखांमध्ये घर! दरम्यान, वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत चर्चा झाली. या बीडीडी चाळीत सध्या तिथं क्वाटर्समध्ये राहत असलेल्या पोलिसांना ५० लाख रूपयांना घरे दिली जातील. २२५० पोलीस कुटुंबीय तिथं राहत असून माणुसकीच्या भावनेतून त्यांचा विचार करण्यात आला आहे, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. या बीडीडी चाळीत पोलिसांना ५०० चौरस फुटांची घरे दिली जातील. ज्याचा वरळीत बांधकाम खर्च १ कोटी ५ लाख इतका आहे. त्यामुळे फुकटात अजिबात घरे दिली जाणार नाहीत. गिरणी कामगार आणि पोलीस यांची तुलना होऊ शकत नाही, असं आव्हाड यांनी स्पष्ट केलं. (असं काय झालं? कॉमेडीयन भारती सिंहने हात जोडून मागितली माफी, तरीही FIR दाखल) 'मुळात ती पोलीस क्वाटर्स आहेत. त्यांचा यावर काहीही हक्क नाही. असं प्रत्येक ठिकाणी झाले तर पोलिसांना मुंबईत राहण्यासाठी क्वार्टर्स मिळणार नाहीत. हा धोरणात्मक निर्णय नाही, वरळीपुरता हा निर्णय आहे. फुकटात घर देणार नाही. त्यांचा मालकी हक्क नाही, सरकारने मोठ्या मनाने घरं देतंय. ५० लाख किंमत द्यावीच लागणार आहे, असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या