आज मुंबईत पश्चिम रेल्वेवर 'जंबो' ब्लॉक

आज मुंबईत पश्चिम रेल्वेवर 'जंबो' ब्लॉक

अंधेरी ते बोरीवली दरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्यरेल्वे मार्गावरील ठाणे-कल्याण या मार्गावर आणि हार्बरवरील नेरूळ-पनवेल अप आणि डाऊन मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर : रेल्वे रुळांची देखभाल, दुरुस्ती व अन्य कामांसाठी रविवारी मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर अंधेरी ते बोरीवली दरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्यरेल्वे मार्गावरील ठाणे-कल्याण या मार्गावर आणि हार्बरवरील नेरूळ-पनवेल अप आणि डाऊन मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

साधारणपणे सकाळी ११ ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम मार्गावरील अंधेरी-बोरीवली स्थानकांदरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे ब्लॉक काळातील वाहतूक अप आणि डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल. मध्य मार्गावर ठाणे-कल्याण धिम्या मार्गावर रविवारी सकाळी १०.४८ ते ४.२३ वाजेपर्यंत ब्लॉक कालावधीत कामे करण्यात येतील. ब्लॉक काळात वाहतूक डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल. यामुळे ब्लॉक काळात कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. प्रवाशांच्या सोयीसाठी दिवा, डोंबिवली, कल्याणमार्गे अप प्रवास करण्याची मुभा रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यामुळे सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत मध्य मार्गावरील लोकल १० मिनीटे उशिराने धावतील.

 

ठाणे-नेरूळ विशेष सेवा हार्बर मार्गावरील नेरूळ-पनवेल मार्गादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ११.२० ते ४.२० या वेळेत ब्लॉक कामे होणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नेरूळ आणि ठाणे-नेरूळ या मार्गावर विशेष फे-या चालवण्यात येतील .

First published: September 24, 2017, 10:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading