मुंबईतला 6-8 तासांचा जम्बोब्लॉक संपला ; गार्डरचं काम पूर्ण

मुंबईतला 6-8 तासांचा जम्बोब्लॉक संपला ; गार्डरचं काम पूर्ण

सकाळी साडे आठला सुरू झालेल्या या ब्ल़ॉकदरम्यान परळ-करीरोड दरम्यान पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्यात आले आहेत. युद्धपातळीवर लष्करानं काम केलं आहे

  • Share this:

04 फेब्रुवारी : मध्य रेल्वेवरील परळ, करी रोड येथील नवीन पादचारी पुलांच्या गर्डरच्या उभारणीसाठी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक अखेर पार पडलाय. सकाळी साडे आठला सुरू झालेल्या या ब्ल़ॉकदरम्यान परळ-करीरोड दरम्यान पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्यात आले आहेत.  युद्धपातळीवर लष्करानं काम केलं आहे

आज सहा तासांच्या किमान वेळात हे कठीण काम लष्कराने पूर्ण केलंय. हे गार्डर उभारताना संपूर्ण मार्गावरील विद्युतपुरवठा खंडीत करण्याची आवश्यकता असते.  त्यामुळे सावधगिरी बाळगत सहा ते आठ तासांपुरता हा प्रवाह खंडीत करण्यात आला होता.  याआधी दर दोन आठवड्यांनी असे जम्बो ब्लॉक घेऊन नियोजित वेळेच्या आधीच लष्करानं एल्फिन्स्टन आणि आंबिवलीच्या पूलाच्या काम पूर्ण केलं होतं.. आजच्या ब्लॉकदरम्यान मध्यरेल्वेच्या उपनगरीय रेल्वेगाड्या कुर्ला, दादरपर्यंतच चालवण्यात आल्या.

एल्फिन्स्टन रोडच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी नंतरया पुलांचं  आणि गार्डरचं काम लष्कराकडे सोपवण्यात आलं होतं

 

 

First published: February 4, 2018, 8:16 AM IST

ताज्या बातम्या