कमला मिल आग प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा; ज्युलिओ रिबेरो यांची याचिका

कमला मिल आग प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा; ज्युलिओ रिबेरो यांची याचिका

मुंबईतील सगळ्या पब, हॉटेल्सचं फायर ऑडिट करण्यात यावं बरं इतकंच नाही तर प्रत्येक वॉर्डात हे फायर ऑडीट करण्यात यावं अशी मागणीही त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.

  • Share this:

09 जानेवारी : लोअर परळमधल्या कमला मिल आग प्रकरणात अनेकांची नावं समोर आल्यानंतर आता याची न्यायालयीन चौकशी होण्यासाठी माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मुंबईतील सगळ्या पब, हॉटेल्सचं फायर ऑडिट करण्यात यावं बरं इतकंच नाही तर प्रत्येक वॉर्डात हे फायर ऑडीट करण्यात यावं अशी मागणीही त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.

कमला मिल आग प्रकरणात एफआयआर झालेल्या सगळ्या प्रकरणांची अॅडिशनल सीपी तयार करून अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापना करा आणि मग सगळ्यांची एकत्र चौकशी करा अशी मागणी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी केली आहे.

त्यामुळे वेगवेगळं वाळण लागलेल्या आणि राजकारण तापलेल्या या आगी प्रकरणात खरंच कसून चौकशी होणार का? या आगीत नाहक बळी झालेल्या 14 जणांना खरा न्याय मिळणार की सगळेच आपली राजकीय पोळी भाजणार हेच बघणं आता महत्त्वाचं आहे. आता या सगळ्यावर मुंबई हायकोर्ट काय निर्णय देईल याकडे आता पुढील तपासाची दिशा असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2018 02:11 PM IST

ताज्या बातम्या