S M L

ज्येष्ठ पत्रकार मुझफ्फर हुसैन यांचं निधन

२००२ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.

Sachin Salve | Updated On: Feb 13, 2018 11:16 PM IST

ज्येष्ठ पत्रकार मुझफ्फर हुसैन यांचं निधन

13 फेब्रुवारी : ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत मुझफ्फर हुसैन यांचं निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. मुंबईतल्या विक्रोळी पार्कसाईट इथं त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

इस्लाम आणि हिंदू धर्माचे ते गाढे अभ्यासक होते. मुझफ्फर हुसैन यांना महाराष्ट्र शासनासह, केंद्र शासनाचंही अनेक पुरस्कार मिळाले. २००२ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.

महाराष्ट्र शासनाचा २०१४ या वर्षासाठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. राजमाता पत्रकारिता पुरस्कार, राममनोहर त्रिपाठी पुरस्कार, पत्रकार केसरी पुरस्कारांनीही त्यांचा गौरव झाला.

मुझफ्फर हुसेन यांनी लिहिलेली अनेक पुस्तके गाजली. त्यापैकी 'इस्लाम आणि शाकाहार', 'मुस्लिम मानसशास्त्र', 'दंगों में झुलसी मुंबई', 'अल्पसंख्याक वाद: एक धोका', 'इस्लाम धर्मातील कुटुंब नियोजन', 'लादेन-दहशतवाद आणि अफगाणिस्तान', 'समान नागरी कायदा', ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2018 11:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close