तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात 'क्रिसलीस'ची धम्माल!

तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात 'क्रिसलीस'ची धम्माल!

तरुणाईच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या 'क्रिसलीस'ची या वर्षीची थीम होती 'श्वाश्वत विकास'

  • Share this:

ठाणे 30 ऑगस्ट : तरुणाईचा सळसळता उत्साह, नेटकं नियोजन, देखणं संयोजन, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या अपूर्व उत्साहात साजरा झाला ठाण्याच्या जोशी बेडेकर कॉलेजचा 'क्रिसलीस' महोत्सव. 'क्रिसलीस' म्हणजे सुरवंटाचं फुलपाखरात रुपांतर होणं. म्हणजेच जमीनीवर पाय रोवून आकाशाला गवसणी घालणं. तरुणाईच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या 'क्रिसलीस'ची या वर्षीची थीम होती 'श्वाश्वत विकास' (Sustainable Development) तापमानात होत असलेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर 'श्वाश्वत विकास' ही काळाची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाचं महत्त्व रुजवून शाश्वत विकासाचं बीजारोपण करण्यासाठीच ही संकल्पना ठेवल्याचं प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी केलं.

चार दिवस विविध कार्यक्रमांनी हा महोत्सव चांगलाच गाजला. 19, 21, 22 आणि 23 ऑगस्ट असे तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांनी 'क्रिसलीस'चा उत्साह वाढत गेला. 19 ऑगस्टला विद्यार्थ्यांनी सामुदायिक स्वच्छता, वृक्षारोपण आणि येऊरच्या अनाथालयात मुलांना खाऊ देत, त्यांना विविध कला शिकवत त्यांच्या चेहेऱ्यावर हसू फुलविण्याचा प्रयत्न केला.

मोदी सरकारची योजना, 30 रुपयांच्या कार्डमुळे होईल कॅन्सरवर उपचार!

21 ऑगस्टला स्टार्ट अप आणि युटूबर्सनी आपल्या प्रयोगाची माहिती देत विद्यार्थ्यांना आपला प्रवास कथन केला. मुलांना त्यातून प्रेरणा मिळावी हा त्याचा मुख्य उद्देश होता. 22 ऑगस्टला VJIT मुंबईचे डॉ. संजय मंगला गोपाळ यांचं अतिशय उद्बबोधक व्याखान झालं. तर 23 ऑगस्टला मुख्य कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून Sandhu Logipark चे Group CEO शुभ्रअरविंद बिराबर उपस्थित होते. खरा आनंद मिळवण्यासाठी आधी स्वत:मध्ये बदल घडवून आणा तरच जग बदलेल असं मत त्यांनी विद्यार्थ्यांसमोर बोलताना व्यक्त केलं. चार दिवस झालेल्या या कार्यक्रमांमध्ये Zuventus Healthcare चे M.D प्रकाशकुमार गुहा, Terepolicy Center च्या संस्थापक डॉ. विनिता आपटे, माजी प्राचार्य लक्ष्मण भोळे, माधवबागचे COO श्रीपाद उपासनी, मेतकुटचे किरण भिडे यांनी सहभाग घेतला.

OMG VIDEO : श्री गणेश नव्हे तर हा आहे ट्री गणेश !

या दरम्यान झालेल्या कार्यक्रमांमध्ये विविध स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं होतं. यात ठाणे आणि मुंबईतल्या 45 कॉलेजेसनी सहभाग घेतला. सी.एच.एम. कॉलेजनी प्रतिष्ठेचा फिरता चषक पटकावला. या कार्यक्रमाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाच्या सर्व जबाबदाऱ्या या  विद्यार्थीच पार पाडत असतात. कार्यक्रमाची आखणी, नियोजन, सजावट, कार्यक्रमासाठीचे प्रायोजक, आदरातिथ्य असं सगळं नियोजन तेच पार पाडतात. त्यासाठी हे विद्यार्थी दोन महिने अविश्रांत मेहनत करत असतात. यातून त्यांना खूप गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यांच्या नेतृत्वाचा कस लागतो.

'क्रिसलीस'च्या समन्वयक डॉ. संगीता दास आणि उप समन्वयक तृप्ती कौटिकवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी अतिशय नेटकेपणाने हा महोत्सव पार पाडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2019 10:22 PM IST

ताज्या बातम्या