मुंबई, 6 मार्च : मुंबईमध्ये असणाऱ्या अभियंत्यांच्या भरतीसाठी हिरयाणातील गुरुग्रामध्ये मुलाखती आयोजित करण्याचा प्रताप Burns & McDonnell या कंपनीकडून करण्यात आला होता. मात्र युवासेनेनं हा मुद्दा उचलल्यानंतर आणि आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर या कंपनीने सदर मुलाखती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित कंपनीने विविध पदांवर आवश्यक असणाऱ्या अभियंत्यांच्या भरतीची जाहिरात कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. संकेतस्थळावरील माहितीनुसार, सदर भरती ही गुरुग्राम हरियाणा येथे करण्यात येणार होती. या कंपनीचे कार्यालया मुंबई इथं आहे. त्यामुळे या भरती प्रकियेमध्ये मुंबई आणि महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना प्राधान्य देणे अपक्षित आहे. मात्र कंपनीतील भरतीसाठी मुलाखती गुरुग्राममध्ये आयोजित करण्याचा प्रताप या कंपनीने केला.
हेही वाचा-महाराष्ट्र 'CID'ची वेबसाइट हॅक, दिल्ली हिंसाचारावरून नरेंद्र मोदींना दिली धमकी
ही माहिती समोर आल्यानंतर युवासेनेनं याविषयी आक्रमक भूमिका घेतली. युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी Burns & McDonnell या कंपनीला एक पत्र लिहित या पदांसाठी भूमिपुत्रांचा विचार व्हावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला. युवासेनेच्या इशाऱ्यानंतर कंपनीने सदर मुलाखती रद्द केल्या आहेत.
Job openings in Mumbai, but walk-in interviews in Gurugram. Yuva Sena, youth wing of @ShivSena, takes up the issue, showing the rule that 80%jobs should go to locals. The company--Burns & McDonnell, cancels recruitment drive. @SardesaiVarun@news18dotcom@CNNnews18pic.twitter.com/21LTmD9sbo
युवासेनेनं कंपनीला लिहिलेलं पत्र
'कायद्यानुसार कंपनीमध्ये आवश्यक असणाऱ्या कर्मचारी वर्गापैकी 80 टक्के कर्मचारी वर्ग हा स्थानिक असला पाहिजे. परंतु आपल्या कंपनीमध्ये आवश्यक असणाऱ्या अभियंत्यांची भरती ही गुरुग्राममध्ये होत आहे. ही बाब महाराष्ट्र राज्यातील भूमिपुत्रांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. तरी शिवसेना आणि युवसेनेच्या वतीने आम्ही आपणास नम्र विनंती करतो की, सदर भरती प्रकियेमध्ये मुंबई-महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे. अन्यथा युवासेना तीव्र आंदोलन करेल,' असा इशारा युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी एका पत्राद्वारे संबंधित कंपनीला दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.