मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'जो उखाडना है उखाडो', संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

'जो उखाडना है उखाडो', संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

' राजकारणामध्ये समोरासमोर येऊन लढण्याची इच्छा असायला हवी. घरातील मुलांना, महिलांवर अशी कारवाई करत असाल तर याला नामर्दपणा म्हणतात'

' राजकारणामध्ये समोरासमोर येऊन लढण्याची इच्छा असायला हवी. घरातील मुलांना, महिलांवर अशी कारवाई करत असाल तर याला नामर्दपणा म्हणतात'

' राजकारणामध्ये समोरासमोर येऊन लढण्याची इच्छा असायला हवी. घरातील मुलांना, महिलांवर अशी कारवाई करत असाल तर याला नामर्दपणा म्हणतात'

 

मुंबई, 28 डिसेंबर :   गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते ईडीच्या कार्यालयात जाऊन कागदपत्र बाहेर काढत आहे.  ईडीच्या कार्यालयामध्ये भाजपच्या नेत्यांनी टेबल लावले आहे का? असा सवाल उपस्थितीत करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. तसंच, 'ईडीच्या चौकशीला आम्ही घाबरत नाही, भले आम्हाला अटक करा' असं आव्हानच राऊत यांनी दिले.

संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

'राजकीय दृष्ट्या दबावाला बळी पडत नाही म्हणून ईडीचा वापर केला जात आहे. हे वैफल्यग्रस्त झाले आहे. राजकारणामध्ये समोरासमोर येऊन लढण्याची इच्छा असायला हवी. घरातील मुलांना, महिलांवर अशी कारवाई करत असाल तर याला नामर्दपणा म्हणतात. असा नामर्दपणा जण कुणी करत असेल तर शिवसेना त्याच शब्दांत आणि त्याच थरारला जाऊन उत्तर दिले जाईल,. जर लढायचे असेल तर समोरासमोर येऊन लढावे' असं आव्हान राऊत यांनी दिले.

पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

- बहुतेक हा राष्ट्रीय विषय झाला आहे, आमच्यासाठी ईडी हा महत्वाचा विषय नाही

-CBI इन्कम टॅक्स, ED एकेकाळी प्रतिष्ठीत मानला जायचा

पण गेल्या काही दिवसांपासून एखाद्या राजकीय पक्षाने आपली भडास काढणं हे लोकांनी गृहीत धारलंय

-सत्तेतल्या राजकीय पक्षाला विरोधकांना राजकीय दृष्ट्या संपवता येत नाही तेव्हा अशा संस्थांची हत्यार वापरावी लागतात

- राजकारणाला समोरासमोर लढायचं असत, घरातल्या मुलांवर, महिलांवर हल्ले करणाऱ्या नामर्दांगी लोकं आगे. अस कोणी करत असेल तर शिवसेना त्याच पद्धतीने उत्तर देईल

- गेल्या महिन्यापासून इडी पत्रव्यवहार करत आहे आम्ही त्यांना सगळी कागदपत्र पुरवत आहोत

- भाजपची माकडं उड्या मारत आहे.  यांची ईडीसोबत हातमिळवणी झाली आहे का?  भाजप कार्यालयात ईडीने टेबल टाकले आहे का?

- ईडीमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही मिळत

- पण भाजपच्या 3 लोकं ईडी कार्यालयात जाऊन कागदपत्र  बाहेर काढतात, त्याचे पुरावे आहेत

- गेल्या 1 वर्षांपासून भाजपचे काही हस्तक माझ्याशी भेटण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राचे सरकार टिकू देऊ नका, मोहात पडू नका, हे सरकार पाडायचे आहे, असं त्यांनी सांगितले

- मला धमकवण्याचाही प्रयत्न केला. आमचे जवळचे लोक, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 22 लोकांची यादी आहे त्यांना ताब्यात घेऊन त्यांना राजीनामे घेण्याचे प्रयत्न करून सरकार पाडलं जाईल प्रताप सरनाईक हे त्याचे टोकण आहेत

- नोव्हेंबरमध्ये सरकार पडण्याची डेडलाईन होती पण आता घरच्यांना नोटिसा पाठवून त्रास देण्याचा प्रयत्न आहे. नोटीस पाठवा वा अटक करा पण सरकार पडणार नाही.

- बायकांच्या पदाराआडून लढाई करण्याची खेळी तुमच्यावर उलटणार.

- 12 वर्षांपूर्वी शिक्षिका असलेल्या मध्यमवर्गीय स्त्रीला घर घेण्यासाठी मैत्रिणीकडून कर्ज घेतले आणि तुम्ही नोटीस पाठवता?

- भाजपचे अकाऊंट उघडा HDIL ने 3 वर्षात भाजपला किती देणग्या डोळ्यात हे आधी जाहीर करा

- माझ्याकडे 20 कोटींचा हिशेब आहे. आमच्यापैकी कोणाची संपत्ती 1600 कोटीने वाढली त्याचा हिशब मागा आधी, अमित शहांवर निशाणा

- कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही मी पण नाही. पण तुमच्या चौकश्या कोण करणार, तुमचे हिशेब कोण पळणार?

- मी तोंड उघडला तर हादरे बसतील. तुमच्या संपत्तीचे मुळा बाळाचे हिशेब आमच्याकडे आहेत. पण आम्ही कुटुंबाला मध्ये आणणार नाही. करायचं झालं तर आम्हाला तुमचं वस्त्रहरण करावं लागेल.

- राजकीय सुडाबाबत असेल तर राजकीय उत्तर दिलं जाईल, हे प्रकरण तुम्हाला महाग पडेल.

- पत्नी उपस्थित राहणार का हा निर्णय अजून घेतला नाही. याबद्दल निर्णय सर्वांशी बोलून घेतला जाईल पवार साहेबांशी आणि पक्षप्रमुखांशी बोलणार.

- माझ्याकडे भाजपच्या 120 नेत्यांची यादी तयार आहे त्याबाबत ईडी काय करणार हे लवकरच कळेल.

First published:
top videos