S M L

तोडगा निघत नसल्यानं जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप सुरुच

काल जेजे रुग्णालयात अत्यावस्थ रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला होता. यामुळे संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना बेदम मारहाण केली होती.

Renuka Dhaybar | Updated On: May 20, 2018 05:04 PM IST

तोडगा निघत नसल्यानं जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप सुरुच

मुंबई, 20मे : जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टर आज दुसऱ्या दिवशीही संपावरच आहेत. काल जेजे रुग्णालयात अत्यावस्थ रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला होता. यामुळे संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना बेदम मारहाण केली होती.

यासंबधी जे जे मार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 4 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संप मिटवण्यासंदर्भात आज निवासी डॉक्टरांची संघटना 'मार्ड' आणि वैद्यकिय शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक प्रकाश वाकोडे यांची बैठक पार पडली.

या बैठकीत आश्वासनापलिकडे काहीही हाती लागलं नसल्याची खंत निवासी डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. मात्र प्रकाश वाकोडे यांनी याविषयी सखोल माहिती देण्याचं टाळलं. रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डची सुरक्षा तातडीनं वाढवावी यामागणीसाठी संप कायम ठेवण्यात आला आहे.संपादरम्यान कुठलीही अत्यावश्यक सेवा आम्ही प्रभावित होवू देणार नाही, संप लांबल्यास आम्ही समांतर ओपीडी सुरु करु अशी माहिती मार्डचे प्रवक्ते अमोल हेकरे यांनी न्यूज१८ लोकमतला दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 20, 2018 05:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close