मुंबई, 24 जुलै : , रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर (Extreme heavy rainfall) दरड कोसळून मोठी दुर्घटना (landslide) घडली. रायगड जिल्ह्यातील महाडजवळ असलेल्या तळीये या गावातील 35 घरांवर दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी दुर्घटनेत होत्याचं नव्हतं झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) स्वत: गावात पोहोचले आहे. तर दुसरीकडे, तळीये गाव उभारण्याची जबाबदारी म्हाडाने (mhada) घेतली आहे, अशी घोषणा नगरविकास मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत तळीये गावाचे पुर्नवसन म्हाडा करणार अशी माहिती दिली आहे. त्यासोबतच तळीये गावातील नवे घर कसे असणार याचा आराखडा सुद्धा आव्हाड यांनी सादर केला आहे.
कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती. pic.twitter.com/vdtJLl33gF
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 24, 2021
'कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसवण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जो शब्द दिला की कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती' असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
योग्य पुनर्वसन करू -मुख्यमंत्री
दरम्यान, या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव यांनी घटनास्थळाचा पाहणी दौरा केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे, अनपेक्षित दुर्घटना घडत आहेत. यातून आपल्याला शिकण्याची गरज आहे. आजकाल पावसाळ्याची सुरुवात सुद्धा चक्रीवादळाने होते. तळीयेतील गावकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. सरकार त्यांना सर्व मदत करेल, संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांचे योग्य पुनर्वसन करू. अशा घटना पाहता डोंगर उतार आणि कडे- कपाऱ्यात राहणाऱ्या वाड्या- वस्त्या यांना स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात येईल.'
आमदार सुरेश धस यांच्यासह 38 समर्थकांवर गुन्हा दाखल, बीडमध्ये एकच खळबळ
'ही आपत्ती इतकी मोठी होती की मदतीला त्याठिकाणी पोहताना जवानांना आणि पथकाला अडचणी आल्या. कारण सगळ्या सामुग्रीनिशी त्यांना बचाव कार्य करायचे होते. राज्य शासन आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी तयार होते. केंद्राने देखील सहाय्य केले, लष्कर, एनडीआरएफ सर्वांनीच मदत केली आहे' असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jitendra awhad