Home /News /mumbai /

"कोण आहे महेश मांजरेकर? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान काय?" Godse सिनेमाच्या घोषणेनंतर जितेंद्र आव्हाड संतापले

"कोण आहे महेश मांजरेकर? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान काय?" Godse सिनेमाच्या घोषणेनंतर जितेंद्र आव्हाड संतापले

"कोण आहे महेश मांजरेकर? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान काय?" जितेंद्र आव्हाड संतापले

"कोण आहे महेश मांजरेकर? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान काय?" जितेंद्र आव्हाड संतापले

who is Mahesh Manjrekar? question asked by Minister Jitendra Awhad: गोडसे सिनेमाच्या घोषणेनंतर आता नवा वाद निर्माण झाला आहे.

  मुंबई, 3 ऑक्टोबर : दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर (Mahesh Manjerekar) यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या (Mahatma Gandhi Jayanti) मुहूर्तावर आगामी 'गोडसे' सिनेमाची (Godse Movie) घोषणा केली. यासोबतच महेश मांजरेकर यांनी इन्स्टाग्रामवरुन गोडसे सिनेमाचा पोस्टर शेअर केला. मात्र हा पोस्टर शेअर होताच नवा वाद उभा राहिला आहे. यावरुन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Minister Jitendra Awhad) यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर निशाणा साधत सडकून टीका केली आहे. महेश मांजरेकर यांच्या गोडसे सिनेमावर जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आपला आक्षेप नोंदवला आहे. आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात, "कोण आहेत महेश मांजरेकर? त्यांचं भारतीय चित्रपटसृष्टीत योगदान काय आहे? फक्त लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी ही नाटकं करत आहेत". जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटनंतर आता महेश मांजरेकर काय प्रतिक्रिया देतात हे पहावं लागेल. पण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्विटनंतर आता गोडसे चित्रपटावरुन नवा वाद निर्माण झाला आहे हे नक्की. 'जोधा अकबर'मधील ही अभिनेत्री कालवश; वयाच्या तिसाव्या वर्षीच घेतला जगाचा निरोप महात्मा गांधी यांच्या 152व्या जयंतीच्या दिवशी महेश मांजरेकर यांनी इन्स्टाग्रामवर गोडसे सिनेमाचा एक पोस्टर रिलीज केला. यासोबतच एक टीझर सुद्धा शेअर केला. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं, यापूर्वी कुणीही सांगण्याचे धाडस केलेले नाही अशा कथेच्या साक्षीसाठी सज्ज व्हा.
  नथुराम गोडसेची कथा माझ्यासाठी नेहमीच ह्रदयाच्या जवळ आहे. या सिनेमाला पाठिंबा देण्यासाठी खूप धैर्य लागतं. कठीण विषय आणि बिनधास्त गोष्टींवर माझा नेहमीच विश्वास आहे. महात्मा गांधी यांच्यावर गोळी झाडणारा व्यक्ती या व्यतिरिक्त गोडसेबद्दल जास्त कुणाला माहिती नाही. त्याच्याबाबत सिनेमातून माहिती सांगत असताना आम्हाला कुणाला पाठिशी घालायचे नाहीये आणि कुणाच्या विरोधात भाष्य सुद्धा करायचे नाहीये. योग्य आणि अयोग्य काय हे ठरवण्याचं प्रेक्षकांवर सोडलेले आहे. महेश मांजरेकर, संदीप सिंग आणि राज शांडिल्य यांनी महात्मा गांधी यांच्या 152व्या जयंतीच्या दिवशी गोडसे सिनेमाची घोषणा केली. हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: Entertainment, Jitendra awhad

  पुढील बातम्या