आझाद काही गुन्हेगार नाही, नजरकैदेत ठेवणे चुकीचे - जितेंद्र आव्हाड

News18 Lokmat | Updated On: Dec 29, 2018 06:30 PM IST

आझाद काही गुन्हेगार नाही, नजरकैदेत ठेवणे चुकीचे - जितेंद्र आव्हाड

मुंबई, 29 डिसेंबर : राष्ट्रवादीचे आमदार जिंतेंद्र आव्हाड यांनी भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतली. "चंद्रशेखर आझादला असं नजरकैदेत ठेवणं चुकीचं आहे, तो काही गुन्हेगार नाही", अशी टीका आव्हाड यांनी सरकारवर केली.

जितेंद्र आव्हाड यांनी मालाड येथील मनाली हाॅटेलमध्ये जाऊन चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतली. या भेटीनंतर आव्हाड यांनी न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधी संवाद साधला. "त्याला हाॅटेलमध्ये डांबून ठेवणे चुकीचे आहे. राज्यात त्याच्यावर एकही गुन्हा नाही. तरीही त्याला डांबून ठेवण्यात आलं आहे. संविधान मानणाऱ्या कार्यकर्त्यांवर अशी कारवाई करणे हा संविधानाचा अपमान आहे", अशी टीका आव्हाड यांनी केली.




दरम्यान, मुंबईत मालाड भागात भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे. 1 जानेवारीच्या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद शुक्रवारी मुंबईत दाखल झाले.

मालाडच्या मनाली हॉटेलमध्ये आझाद मुक्कामाला आहेत. शुक्रवारी रात्री चैत्यभूमीला निघालेल्या आझाद आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडलं होतं. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आझाद यांना नजरकैदेत ठेवलं आहे.

मुंबई आणि पुण्यात सभा घेण्याची घोषणा आझाद यांनी केली होती. परंतु, त्यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे दलित कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

1 जानेवारीला कोरेगाव-भीमाला जाण्याचा निर्धारही आझाद यांनी बोलून दाखवला आहे.

====================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 29, 2018 06:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close