• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • 'टीका करणं सोपं, उद्धव ठाकरे होणं कठीण!' मुख्यमंत्र्यावरील टीकेवरून आव्हाडांचा फडणवीसांना टोमणा

'टीका करणं सोपं, उद्धव ठाकरे होणं कठीण!' मुख्यमंत्र्यावरील टीकेवरून आव्हाडांचा फडणवीसांना टोमणा

बेल्जियमने लॉकडाऊन केलं पण त्या सरकारनं पॅकेज जाहीर केल्याचं ट्वीट करत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मात्र त्यांच्या या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी पुढ येत उत्तर दिलं.

 • Share this:
  मुंबई, 03 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री राज्यातील जनतेला संबोधताना कोरोनाबाबतची बरीच माहिती दिली. यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे मंत्रिमंडळातील सहकारी असलेले गहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या मदतीला धावून आले. आव्हाड यांनी फडणवीसांवर पलटवार करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभारही मानले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या जगभरातील स्थितीची माहिती देताना कोणत्या देशात सध्या काय स्थिती आहे याबाबत माहिती दिली होती. त्यावेळी कोणत्या देशांमद्ये सध्या पुन्हा लॉकडाऊन लावावा लागला आहे, हेही उद्धव यांनी सांगितलं होतं. त्यात बेल्जियमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागल्याचा उल्लेख होता. हाच मुद्दा पकडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. बेल्जियमने लॉकडाऊन केलं पण त्या सरकारनं पॅकेज जाहीर केल्याचं ट्वीट करत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मात्र त्यांच्या या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी पुढ येत उत्तर दिलं. बेल्जियमनं पॅकेज दिलं पण ते तिथल्या केंद्र सरकारनं केलं. तुम्हीही तुमचे वजन वापरून आपल्याला पॅकेज मिळते का पाहा, असा टोला आव्हाडांनी लगावला. जीएसटीच्या थकबाकीवरूनही टीका राज्याचे हक्काचे जीएसटीचे 24 हजार कोटी केंद्राकडे बाकी आहेत. तुमच्या एका शब्दावर ते मिळू शकतात. राज्याच्या हितासाठी तेवढं करा, अशा शब्दांत आव्हाडांनी टीकेचा भडीमार केला. सलाम! सलाम!! सलाम!!! यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंचं तोंडभरुन कौतुकही केलं. कुटुंबात पत्नी आणि मुलगा कोरोनाशी झगडत आहे. स्वतःची प्रकृती सांभाळून या व्यक्तीने संपूर्ण महाराष्ट्र सांभाळलाय. त्यामुळं टीका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं सोपं नाही असं म्हणत, आव्हाडांनी फडणवीसांना सुनावलं. कोरोनाच्या मुद्द्यावरून काही नेते राजकारण करत असल्याची टीका उद्धव यांनी केली होती. पण गरज पडली तर राज्याच्या हितासाठी लॉकडाऊनचा निर्णय घ्यायला मागेपुढे पाहणार नाही असं उद्धव यांनी स्पष्ट केलं होतं. त्यासाठी त्यांनी काही उदाहरणं दिली होती.
  Published by:News18 Desk
  First published: