लोकसभा 2019: शरद पवारांनी आव्हाडांना दिले पक्षातील मोक्याचे पद!

लोकसभा 2019: शरद पवारांनी आव्हाडांना दिले पक्षातील मोक्याचे पद!

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.

  • Share this:

मुंबई, 03 एप्रिल: लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही नियुक्ती केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी लक्षात घेऊन पवार यांनी आव्हाड यांच्याकडे पक्षातील मोक्याचे पद सोपवले आहे. आव्हाड हे पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच या महत्त्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

सोशल मीडिया असो किंवा अन्य प्रसारमध्यमांसमोर आव्हाड नेहमीच पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडत असतात. भाजप आणि शिवसेनेवर त्यांनी अनेकदा आक्रमक टीका देखील केली आहे. दोनच दिवसांपूर्वी शरद पवारांवर टीका केली म्हणून त्यांनी भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता.

काय म्हणाले होते आव्हाड

'जंगलातील शंभर कुत्रे एका वाघाची शिकार करु शकत नाहीत, ते फक्त भुंकू शकतात', अशा खालच्या पातळीवरची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती. पाटील यांनी कालच 'शरद पवार हे चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करतात,' असा गंभीर आरोप केला होता. त्याला उत्तर देताना आव्हाड यांनी अशा प्रकारचे शब्द वापरले होते.

आव्हाड यांनी रविवारी ट्विटरवर दोन पोस्ट शेअर केल्या होत्या. ज्यात त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्ला चढवला. कधी एकही निवडणूक न जिंकलेले नाहीत. लॉटरी लागली म्हणून तुम्ही जिंकून आलात. गेल्या 2-3 दिवसात तुम्ही ज्या पद्धतीने शरद पवारांवर टीका करत आहात. पण तुमच्या लक्षात आले आहे की पवार साहेबांवर टीका केली की हेडलाईन मिळते. तळागाळात माहित नसलेल्या चंद्रकांत दादांना लोक ओळखू लागतात. कारण काय तर ते शरद पवारांवर टीका करतात. अशाच प्रकारची टीका गोपीनाथ मुंडे यांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी 1990-95 या काळात केले होते, असे आव्हाडांनी व्हिडिओत म्हटले होते.

VIDEO : रावसाहेब दानवे पुन्हा चुकले! विंग कमांडर अभिनंदनबद्दल केलं 'हे' वक्तव्य

First published: April 3, 2019, 7:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading