Home /News /mumbai /

'बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी मिलेट्री आणू दे, माझ्या बापाचं काय जातं?', जितेंद्र आव्हाड भडकले

'बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी मिलेट्री आणू दे, माझ्या बापाचं काय जातं?', जितेंद्र आव्हाड भडकले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे व्यथित झाले आहेत. त्यांचं हे व्यथित होणं हे आज त्यांच्या वागणुकीतून दिसून आलं आहे.

मुंबई, 26 जून : राज्यात सत्तेचा सारिपाटीचा खेळ चांगलाच रंगताना दिसतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या जवळचे आणि विश्वासू आमदार एक-एक करुन गुवाहाटीला जात आहेत. महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) डगमगू लागलं आहे. कारण महत्त्वाच्या मंत्र्यांनी सत्ताधारी सरकार विरोधात बंड पुकारलं आहे. शिवसेनेच्या (Shiv Sena) दिग्गज नेत्यांचं हे बंड यशस्वी ठरलं तर त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांना बसू शकतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे उद्धव ठाकरे यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभे आहेत. या सगळ्या घटनाक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे देखील व्यथित झाले आहेत. त्यांचं हे व्यथित होणं हे आज त्यांच्या वागणुकीतून दिसून आलं आहे. जितेंद्र आव्हाड आज ठाण्यात आले होते. यावेळी त्यांचा रोष बघायला मिळाला. जितेंद्र आव्हाज आज एका कार्यक्रमानिमित्ताने ठाण्याला आले होते. यावेळी त्यांना पत्रकारांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रश्व विचारले. पण आव्हाडांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर बोलणं टाळलं. यावेळी पत्रकारांनी त्यांना बंडखोर आमदारांना केंद्राकडून CRPF जवानांच्या सुरक्षेबाबत प्रश्न विचारला असता ते भडकले. "अरे मिलेट्री आणू दे ना, माझ्या बापाचं काय जातं?", असं आव्हाड संतापात म्हणाले. (राज्यपाल लागले कामाला, एकनाथ शिंदे गटासाठी पोलीस आयुक्तांना लिहिले पत्र) शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. नाराज आमदारांनी बंड पुकारलेलं आहे. अशात शिवसैनिक मात्र भडकले आहेत. या पार्श्वभूमीवर काल अनेक शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या घराबाहेर तसंच कार्यालयात तोडफोड आणि दगडफेक केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर केंद्राने या आमदारांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. काल शिंदे गटातील 15 आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. काल झालेल्या तोडफोडीच्या आणि हिंसक घटनांनंतर केंद्र सरकारने शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळपर्यंत 15 आमदारांच्या घरी सीआरपीएफचे जवान तैनात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Jitendra awhad, NCP, Shiv sena

पुढील बातम्या