• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • 'आपल्या आमदारासाठी मुख्यमंत्र्यांचा निर्णय वाखण्याजोगा, जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान

'आपल्या आमदारासाठी मुख्यमंत्र्यांचा निर्णय वाखण्याजोगा, जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान

'ही घर काही माझ्या बापाची नाहीत. जर गरिबांना घर मिळत असतील तर माझं काय जातंय, याबाबतीत एकाही स्थानिकाला डावललं नाही'

 • Share this:
  मुंबई, 23 जून: 'मला आनंद आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) आपल्या आमदारांचा किती सन्मान करतात, आपल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्याने आपली परवानगी घेऊन घेतलेल्या निर्णयाला जर आपला शिवसेनेचा (Shivsena MLA) आमदार विरोध करतोय तर त्याची मर्जी पहिली राखली पाहिजे, हा त्यांच्या दृष्टीकोन हा मला वाटतो की एक नेता म्हणून वाखण्याजोग्या आहे' असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad) यांनी केलं आहे. महाविकास आघाडीमध्ये रोज नव्या कुरबुरी बाहेर पडत आहे. यावेळी वाद समोर आलाय तो सेना राष्ट्रवादी मधला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कॅन्सरग्रस्त नागरिकांच्या नातेवाईक यांना मुंबईत राहण्याची सोय व्हावी म्हणून परेल भागात म्हाडाची 100 घरं (Mahada houses to relatives of cancer patients) देण्याचा निर्णय घेतला होता. पण या निर्णयाला स्थानिक आमदार अजय चौधरी आणि रहिवाशांचे विरोध आहे. नागरिक आणि आमदार यांना विचारात न घेतल्याने नागरिक नाराज आहेत. त्यांच्या या भूमिकेवर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे.

  लाडाची लेक! झिवाचा 'माही' बाबा सोबतचा हा Cute Photo पाहिला का?

  'ही घर काही माझ्या बापाची नाहीत. जर गरिबांना घर मिळत असतील तर माझं काय जातंय, याबाबतीत एकाही स्थानिकाला डावललं नाही. टीव्हीवर सांगितलं जातंय कोणाची तरी घरे काढून घेतली जात आहेत, तर मी माझ्या मेलेल्या आईची शप्पत घेतो मी त्यातला माणूस नाही, माझी आई देखील 27 दिवसांत कॅन्सरने वारली आहे, असे धंदे मी करत नाही, मी कोणाची घर काढून घेतली नाही. जे अधिकचे गाळे वाटण्यात आली त्यांच्यावर म्हाडाचा अधिकार होता ती वाटण्यात आली आहेत, असं प्रतिउत्तर  जितेंद्र आव्हाड यांनी अजय चौधरींना दिलं. तसंच ' मला आनंद आहे की उद्धव ठाकरे आपल्या आमदारांचा किती सन्मान करतात, आपल्या मंत्री मंडळाच्या मंत्र्याने आपली परवानगी घेऊन घेतलेल्या निर्णयाला जर आपला शिवसेनेचा आमदार विरोध करतोय तर त्याची मर्जी पहिली राखली पाहिजे. हा त्यांच्या दृष्टीकोण हा मला वाटत की एक नेता म्हणून वाखण्याजोग्या आहे असं वक्तव्यही जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.

  घरातील सोन्याचं करा हॉलमार्किंग, अन्यथा गोल्ड लोन घेण्यासाठी येतील समस्या

  'परळ नाक्यावर ही शंभर वर्षे जुनी चाळ होती. तिचा पुनर्विकास करण्याचं ठरलं आणि तिचा पुनर्विकास झाल्यानंतर तिथल्या एकाही रहिवाश्याला बेघर केलेलं नाही, आर आर बोर्डानुसार, अधिकचे घर मास्टर लिस्ट मध्ये जातात आणि त्यातून विस्थापितांना तिथे अधिकची घरे देणं हा म्हाडाला अधिकार आहे, यातील १९२ घर म्हाडाच्या हातात होती. मुख्यमंत्र्यांनीच कॅन्सरग्रस्तांच्या म्हाडा सदनिकांना परवानगी दिली होती, मी कोणतीही गोष्ट पुर्व परवानगी शिवाय करत नाही, असं स्पष्टीकरणही जितेंद्र आव्हाड यांनी दिलं. तर आमदार अजय चौधरी यांच्या सांगण्यावरून त्यांची अनेक कामे मी केली, असं प्रतिउत्तरही आव्हाड यांनी दिलं. परळ येथील १०० सदनिका या कॅन्सर पीडितांच्या नातेवाईकांना तात्पुरत्या स्वरुपात दिल्या जाणार असून तिथे कॅन्सर रुग्ण राहणार नाही. हा अजय चौधरी यांचा गैरसमज असून तो गैरसमज दूर केला जाईल पण, कॅन्सर हवेतून पसरणारा आजार नाही, असा टोलाही यावेळेस जितेंद्र आव्हाड यांनी आमदार अजय चौधरी यांना लगावला.
  Published by:sachin Salve
  First published: