Home /News /mumbai /

भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपली, आव्हाड म्हणाले धमकी कुणाला देताय?

भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपली, आव्हाड म्हणाले धमकी कुणाला देताय?

तुम्ही का घाबरत आहात? तुमचं काळाबेर बाहेर याची तुम्हाला भीती वाटते का?

मुंबई 28 जानेवारी : भीमा कोरेगाव प्रकरणाच्या तपासावरून निर्माण झालेला वाद आता चिघळला आहे. NIAला या प्रकरणाच्या तपासाची कागदपत्र देण्यास पुणे पोलिसांनी नकार दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं. NIAला तपासामध्ये सहकार्य केले नाही तर राज्यसरकार बरखास्त होईल असं विधान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली होतं त्यावरून आता भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपलीय. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावरून मुनगंटीवारांना धारेवर धरलंय. भीमा कोरेगावचा तपास हा चुकीच्या मार्गाने नेला गेला. यात तत्कालीन फडणवीस सरकारने पोलिसांना खोटे पुरावे गोळा करायला लावले असा आरोप शरद पवारांनी केला होता. त्यानंतर तडकाफडकी गृहखात्याने हा तपास NIAकडे दिला होता. त्यानंतर वाद सुरू झाला. आव्हाड म्हणाले, धमकी कुणाला देताय? निवडनुकीत महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकला नाही. तुम्ही का घाबरत आहात? भीमा कोरेगावचा तपास महाराष्ट्र पोलिसच करतील. तुमचं काळाबेर बाहेर याची तुम्हाला भीती वाटते का? आम्ही सहकार्य करतोय, तुम्ही संघर्ष करू नका. VIDEO...नाही तर बँक फोडून टाकेल, खासदार नवनीत राणा बँक अधिकाऱ्यांवर भडकल्या काय आहे प्रकरण? भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणाच्या तपासावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटण्याची चिन्ह आहे. या तपासाची कागदपत्रं ताब्यात घेण्यासाठी एनआयए राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी(National Investigation Agency )ची टीम आज दिवसभर पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाली होती. पण रिकाम्या हातानेच या टीमला परतावे लागले आहे.

महाविकास आघाडीतल्या वाचाळवीरांनी वाढवली उद्धव ठाकरेंची डोकेदुखी

आज या प्रकरणाच्या तपासाची कागदपत्र हाती घेण्यासाठी एनआयएची टीम दिवसभर पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसली होती. परंतु, पोलीस महासंचालक कार्यालयाकडून परवानगी येत नाही. तोवर तपासाची कागदपत्र देता येणार नाहीत, असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं होतं. अखेर रात्री उशिरा ही टीम रिकाम्या हाताने माघारी परतली.

लग्नाच्या निमंत्रणासाठी या तरुणांनी लढवली अशी भन्नाट आयडिया

एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे वर्ग करण्याच्या मु्द्दयावर राज्य सरकार सर्व कायदेशीर बाबींचा तपास करत आहे. तसंच यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी तयारी सुरू आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Bhima Koregaon Case

पुढील बातम्या