• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • जितेंद्र आव्हाडांनी आपल्याच गृहमंत्र्यांना धरलं धारेवर, पोलिसांविरुद्ध संताप

जितेंद्र आव्हाडांनी आपल्याच गृहमंत्र्यांना धरलं धारेवर, पोलिसांविरुद्ध संताप

पुणे पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची आणि दुर्दैवी असून त्याविरुद्ध कारवाई व्हायला पाहिजे.

 • Share this:
  मुंबई 7 फेब्रुवारी : राज्यात महाघाडीचे सरकार आलं त्यात गृहखाते राष्ट्रवादीकडे असूनही पोलिसांच्या भूमिकेत बदल झालेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कारवाई बाबत सरकारच्या मंत्र्यांमध्ये नाराजी उघड झाली आहे. पुण्यात महात्मा गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात तुषार गांधी यांना भाषण करू दिलं गेलं नाही. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी थेट ट्विटरवरूनट नाराजी व्यक्त केली. पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची आणि दुर्दैवी असून त्याविरुद्ध मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोललो असल्याचं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्येच संवाद नसल्याचं स्पष्ट झालंय. अनिल देशमुख हे तुषार गांधी यांच्याशी बोलणार असल्याचंही आव्हाडांना सांगितलंय. तुषार गांधी यांचं पुण्यातल्या मॉडर्न महाविद्यालयात भाषण ठेवण्यात आलं होतं. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणांवरून पुणे पोलिसांनी भाषणाला परवानगी नाकारली होती त्यावरून वाद निर्माण झालाय. कोरेगाव भीमा प्रकरणी देखील शरद पवार पोलिसांच्या भूमिकेबाबत चौकशीची मागणी करत असतानाही अजून ही गृह खात्याने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन ही गृह खात्याचा कारभार आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महाराष्ट्र भाजपमध्ये मोठ्या बदलाची शक्यता, पंकजा मुंडेंना मिळणार प्रदेशाध्यपद? काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप व्यक्त केलाय. ते म्हणाले, तुषार गांधींचं भाषण होऊ दिलं नाही हे गंभीर आहे, गृहमंत्र्यांनी याची दखल घ्यावी. जहरी वातावरण झालंय, त्यामुळं टँक्सी ड्रायव्हर एका प्रवाशाजवळ डफडी असल्याने आणि तो शाहीन बागविषयी बोलत असल्याने पोलीस स्टेशनली घेऊन गेला होता त्या घटनेवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पण गेल्या काही काळात जे वातावरण झालंय त्यामुळं अधिकारी कार्यकर्त्यासारखे वागत आहे अशी टीकाही त्यांनी केलीय. हेही वाचा... 'मातोश्री'बाहेर मनसेची पोस्टरबाजी, उद्धव ठाकरेंना दिलं थेट आव्हान

  दिल्ली निवडणुकीनंतर भाजपचं महाराष्ट्रात पुन्हा 'ऑपरेशन लोटस'

  Published by:Ajay Kautikwar
  First published: