JioFiber झालं लाँच, TV Video कॉलिंग आणि Conference ची सुविधा मिळणार!

JioFiber झालं लाँच, TV Video कॉलिंग आणि Conference ची सुविधा मिळणार!

या सुविधेमुळे इंटरनेटचा वेग वाढणार असून व्हिडीओ कॉलिंगही अधिक वेगाने आणि स्पष्टपणे होणार आहे. यासाठी रिलायन्सने अनेक आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत.

  • Share this:

मुंबई 5 सप्टेंबर : सगळ्यांना प्रतिक्षा असलेली रिलायन्सची जिओ फायबर (JioFiber) ही सेवा आजपासून लाँच झालीय. रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी JioFiber च्या वेलकम ऑफरमध्ये अनेक सुविधा नि:शुल्क देण्याची घोषणा केली होती. या सुविधेमुळे इंटरनेटचा वेग वाढणार असून व्हिडीओ कॉलिंगही अधिक वेगाने आणि स्पष्टपणे होणार आहे. यासाठी रिलायन्सने अनेक आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत. JioFiberचा डेटा प्लान 100 Mbps ने सुरू होणार असून तो 1 Gbps पर्यंत असणार आहे. JioFiber च्या 100 Mbps स्पीड च्या डेटा प्लान ची किंमत 699 रुपए आहे. तर 1 Gbps डेटा स्पीड ची किंमत 8,499 येवढी आहे.

'ब्रॉन्झ प्लान' 699 चा 'ब्रॉन्झ प्लान' आहे. त्याची किंमत 699 आहे. यात 100 Mbps चा वेग मिळणार आहे. या योजनेत 100 GB5 GB एक्सट्रा डेटा मिळेल. या बेसिक प्लानमध्ये देशभरात फ्री वॉइस कॉलिंग, TV व्हिडीओ कॉलिंग तसच गेमिंग सारख्या सुविधा मिळणार आहेत.

खूशखबर! 4 दिवसांनी पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर

'सिल्व्हर प्लान' 849 चा आहे. यात 100 GB5 GB डेटा जास्त मिळणार आहे. या प्लानमध्येही  100 Mbps की स्पीड मिळेल. या योजनेतही देशभरात फ्री व्हॉइस कॉलिंग, TV व्हिडियो कॉलिंग आणि Conference, होम नेटवर्किंग आणि डिव्हाइस सिक्युरिटीसारख्या सुविधा मिळणार आहे.

गोल्ड आणि डायमंड प्लान. गोल्ड प्लानमध्ये 250 Mbps चा वेग तर डायमंड प्लान मध्ये 500 Mbps चा वेग असेल. गोल्ड प्लान मध्ये  500 gb250 gb एक्स्ट्रा डेटा मिळेल. तर डायमंड मध्ये 1250 gb250 gb एक्सट्रा डेटा मिळेल. गोल्ड प्लानची किंमत  1,299 तर डॉयमंड प्लान ची किंमत 2,499 एवढी आहे. या योजनेतही देशभरात फ्री व्हॉइस कॉलिंग, TV व्हिडियो कॉलिंग आणि Conference, होम नेटवर्किंग आणि डिव्हाइस सिक्युरिटीसारख्या सुविधा मिळणार आहे.

बंपर धमाका! कार खरेदीवर एक लाख रुपयांपर्यंत सूट

प्लेटिनम प्लान 1 Gbps वेग असलेल्या प्लेटिनम प्लान 3,999 मध्ये तुम्ही घेऊ शकता. यात 2500 gb डेटा मिळेल. या योजनेतही देशभरात फ्री व्हॉइस कॉलिंग, TV व्हिडियो कॉलिंग आणि Conference, होम नेटवर्किंग आणि डिव्हाइस सिक्युरिटीसारख्या सुविधा मिळणार आहे. त्याच बरोबर VR एक्सपीरिअंस आणि प्रीमियम कंटेंट सर्व्हिस सपोर्ट मिळणार आहे.

नोकरी गेली तरीही काळजी करू नका, 'असा' भरा तुमचा EMI

 'टाइटेनियम' सर्वात महागडा प्लान 'टाइटेनियम' आहे. या प्लान मध्ये 1 Gbps वेग आणि 5000 gb अनलिमिटेड डेटा मिळेल. या योजनेतही देशभरात फ्री व्हॉइस कॉलिंग, TV व्हिडियो कॉलिंग आणि Conference, होम नेटवर्किंग आणि डिव्हाइस सिक्युरिटीसारख्या सुविधा मिळणार आहे. त्याच बरोबर VR एक्सपीरिअंस आणि प्रीमियम कंटेंट सर्व्हिस सपोर्ट मिळणार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 5, 2019, 9:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading