रांची/मुंबई, 23 डिसेंबर : मुंबईत एका मॉडेलवर बलात्काराच्या (Mumbai Model rape case) आरोपानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Jharkhand CM Hemant Soren) यांच्यावर विरोधी पक्षाने निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेत्यांकडून हेमंत सोरेन यांच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपावर सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान भाजप नेता सातत्याने हेमंत सोरेन यांना घेराव घालण्यासाठी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत.
भाजप नेत्यांनी केला हल्लाबोल
हरियाणाचे भाजप नेता अरुण यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये काँग्रेसवरही सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. यामध्ये ते म्हणतात की, काँग्रेस निवडणुकीत अल्पसंख्यांच्या हिताचा विचार करीत असल्याचा दावा करते. मात्र ज्या सरकारच्या मुख्यमंत्र्यावर बलात्काराचा आरोप आहे, त्यावर काँग्रेस काय करणार?
दुसरं ट्वीट भाजप नेता विकास प्रीतम सिन्हा यांनी केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, झारखंडचे सीएम यांनी इतिहास रचला आहे. असा इतिहास ज्याच्या जवळही कोणी पोहोचू शकण्याची इच्छा बाळगणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बलात्कार प्रकरणातील आरोपी आहेत आणि तरीही खुर्चीवर आहेत. हेमंत यांची नैतिकता आणि आत्मा केव्हाच मेली आहे. त्यांच्या या पापात राहुल व प्रियांका गांधी यांचांही हात आहे.
हे ही वाचा-लॉकडाऊनमध्ये कोणत्या नेत्याने केली सर्वाधिक मदत; राहूल गांधींच्या नावाचा समावेश
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाने 2013 मध्ये मुंबईतील एका मॉडेलसोबत कथित बलात्काराची घटना समोर आल्यानंतर चर्चा सुरू झाली. एनसीडब्ल्यूच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी या प्रकरणात महाराष्ट्र पोलीस महानिर्देशकांना चिठ्ठी लिहिली आहे. मॉडलसोबत बलात्कार प्रकरणात झारखंडचे सीएम हेमंत सोरेन याचं नाव समोर आलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार झारखंडचे सीएम हेमंत सोरेन आणि सुरेश नागरे यांना मॉडेलवरील बलात्काराच्या प्रकरणात आरोपी बनवलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार 2013 मध्ये हेमंत सोरेन आणि सुरेश नागरे यांनी केवळ मुंबईतील एका मॉडेलवर बलात्कार केलं होतं, तर तिला व तिच्या कुटुंबीयांना सार्वजनिक स्वरुपात या प्रकरणाबाबत बोलू नये यासाठी धमकी दिली होती.
बलात्कार पीडिता मॉडेलची चिठ्ठी व्हायरल
मीडिया रिपोर्टनुसार सांगितलं जात आहे की, व्हायरल पत्र कथित स्वरुपात पीडितेकडून लिहिली आहे. ज्यामध्ये गेल्या 7 वर्षात घडलेल्या घटनांची माहिती दिली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे चेअरपर्सन रेखा शर्मा यांनी मॉडेलच्या कथित स्वरुपातील बलात्कार प्रकरणात पुढाकार घेत महाराष्ट्र पोलीस महानिर्देशक यांना चिठ्ठी लिहिली आहे. 2013 मध्ये या प्रकरणात पूर्ण रिपोर्ट दाखल करण्यात आली होती.
हेमंत सोरेन यांच्यावर मॉडेलने लावला बलात्काराचा आरोप
चिठ्ठीमध्ये असाही दावा केला आहे की, 2013 मध्ये सुरेश नागरे यांनी मॉडेलला काही जणांची भेट घडविण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावलं. येथे हेमंत सोरेनसह 3 लोक उपस्थित होते. हॉटेलमध्ये मॉडेलसह बलात्कार करण्यात आला. चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे की, जेव्हा ती या प्रकरणाची तक्रार घेऊन पोलिसांकडे पोहोचली तेव्हा त्यांनीच तिचा अपमान केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.