मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरण : शवविच्छेदन अहवालानंतर महत्त्वाची माहिती उघड

जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरण : शवविच्छेदन अहवालानंतर महत्त्वाची माहिती उघड

मुंबईत नववर्षाचं स्वागत करताना झालेल्या पार्टीमध्ये झालेल्या जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरणात (Jhanvi Kukreja Murder Case) शवविच्छेदनाचा अहवाल (autopsy report) समोर आला आहे.

मुंबईत नववर्षाचं स्वागत करताना झालेल्या पार्टीमध्ये झालेल्या जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरणात (Jhanvi Kukreja Murder Case) शवविच्छेदनाचा अहवाल (autopsy report) समोर आला आहे.

मुंबईत नववर्षाचं स्वागत करताना झालेल्या पार्टीमध्ये झालेल्या जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरणात (Jhanvi Kukreja Murder Case) शवविच्छेदनाचा अहवाल (autopsy report) समोर आला आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 14 जानेवारी :  मुंबईत नववर्षाचं स्वागत करताना झालेल्या पार्टीमध्ये झालेल्या जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरणात (Jhanvi Kukreja Murder Case) शवविच्छेदनाचा अहवाल (autopsy report) समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये तिच्यावर कोणतेही लैंगिक अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालं नाही. मात्र जान्हवीच्या शरिरावर एकूण 48 जखमा आढळल्या आहेत. यामध्ये कवटीला (Skull) झालेल्या जखमेचाही समावेश आहे. या रिपोर्टमुळे तिच्या या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. काय आहे प्रकरण? मुंबईतील खार (Khar) परिसरात असणाऱ्या भगवती हाइट्स या इमारतीत नववर्षाच्या सुरुवातीलाच जान्हवी कुकरेजा या 19 वर्षांच्या तरुणीचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी जान्हवीचा बॉयफ्रेंड श्री जोगधनकर आणि जुनी मैत्रिण दिया पडाळकर यांना अटक केली होती.  या हत्या प्रकरणातील प्राथमिक माहितीनुसार जान्हवीनं दोन्ही आरोपींना अश्‍लील कृत्य करताना पाहिलं होतं. यानंतर या तिघांमध्ये भांडण सुरू झालं. या भांडणातून दोन्ही आरोपींनी योजना आखून जान्हवीची हत्या केली.  वांद्रे कोर्टानं या आरोपींना 14 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे. खार पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी (Forensic experts) पुन्हा एकदा क्राईम सीन तयार केला होता. मात्र अजूनही त्यांना हत्येचा उद्देश (motive) सिद्ध करता आलेला नाही. पोलिसांनी या प्रकरणातल्या आरोपींच्या DNA रिपोर्टच्या आधारे घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांची पडताळणी केली आहे. “आम्ही सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरचा जबाब नोंदवला आहे. या प्रकरणातला आरोपी श्री जोंधळेकरनं जान्हवीचा अपघाती मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्याजवळ केला होता,’’ अशी माहिती खार पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी गजानन कडबुळे यांनी दिली आहे. ‘जस्टीस फॉर जान्हवी’ मोहीम या प्रकरणातल्या आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी पीडित कुटुंबीयांच्या वकिलांनी केली आहे. कुकरेजा परिवारानं ‘जस्टीस फॉर जान्हवी’ (Justice for Jhanvi) ही ऑनलाईन मोहीम देखील सुरु केली आहे. या मोहिमेला आत्तापर्यंत 14 हजारांपेक्षा जास्त जणांनी स्वाक्षरी करुन पाठिंबा दिला आहे. दरम्यान या प्रकरणातला मुख्य आरोपी श्री जोंधळेकरच्या वकिलांनी पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यास विरोध केला आहे. या प्रकरणात आरोपी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
First published:

Tags: Crime, Mumbai, Murder

पुढील बातम्या