Home /News /mumbai /

नरहरी झिरवळांबाबतचा 'तो' शब्द ठरला वादग्रस्त; टीका होताच जयंत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

नरहरी झिरवळांबाबतचा 'तो' शब्द ठरला वादग्रस्त; टीका होताच जयंत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

'सरकार गेलं पण माज उतरलेला नाही. मी जयंत पाटलांचा जाहीर निषेध करतो. त्यांनी झिरवळांचा उल्लेख आदिवासी असा केला आहे, अशी टीका गोपीचंद पडळरांनी केला

    मुंबई 03 जुलै : राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची बहुमताने विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यानंतर सभागृहामध्ये बोलताना अनेक राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Faction) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. सभागृहातून बाहेर आल्यावरही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बंडखोर आमदारांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. Assembly Speaker Election : 39 आमदारांनी व्हीप मोडला, शिवसेनेकडून तक्रार दाखल, तर शिंदे गटाकडून 16 आमदारांविरोधात पत्र 39 सदस्यांनी व्हीपच्या विरोधात मतदान केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदाराचा पराभव झाला. त्यामुळे, बंडखोर आमदार निलंबित होणार हे नक्की. याला २-४ महिने उशीर होऊ शकतो, मात्र त्यांचं निलंबन नक्की होणार, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. दरम्यान सभागृहात नरहरी झिरवळ यांच्याबद्दल बोलताना जयंत पाटील यांनी आक्षेपार्ह शब्दाचा उल्लेख केला होता. यावरुनही त्याठिकाणी गोंधळ उडाला. यावर बोलताना 'सरकार गेलं पण माज उतरलेला नाही. मी जयंत पाटलांचा जाहीर निषेध करतो. त्यांनी झिरवळांचा उल्लेख आदिवासी असा केला आहे. जयंत पाटील यांच्या पक्षात अजूनही जातीवाद भरला आहे अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. या विषयावरही जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सभागृहात खडाजंगी; कोण काय म्हणाले? नरहरी झिरवळ यांच्याविषयी जे भाष्य केलं आहे, ते विधानसभेच्या पटलावरून काढून टाकलं आहे. मला झिरवळ यांच्याविषयी असं काही बोलायचं नव्हतं. परंतु त्याचा अर्थ चुकीचा लावला गेला आहे. मी झिरवळ यांच्या कामाचं कौतुक करत होतो, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Jayant patil

    पुढील बातम्या