खडसे भाजपमधील 'बाहुबली' असतील तर 'कटप्पा' कोण?- जयंत पाटील

सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसलेल्या एकनाथ खडसेंनी कटप्पाने बाहुबली को क्यो मारा असा सवाल विचारला. त्याचाच संदर्भ घेत जयंत पाटलांनी खडसेंसारख्या बाहुबलीला कोणत्या कटप्पानं मारलं असंही विचारलं.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 21, 2017 05:53 PM IST

खडसे भाजपमधील 'बाहुबली' असतील तर 'कटप्पा' कोण?- जयंत पाटील

21 मे : जीएसटी विधेयकासाठी सुरू असलेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनातल्या चर्चेत कटप्पा आणि बाहुबली सिनेमाच्या संदर्भातली चर्चा सुरु झालीये. एकनाथ खडसे भाजपमधील बाहुबली असतील तर कटप्पा कोण? असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित करताच विधानसभेत एकच हशा पिकला.

 

एकनाथ खडसे संघर्ष यात्रेच्या स्वागताला का उभे होते असा सवाल जयंत पाटलांनी त्यांच्या भाषणादरम्यान उपस्थित केला. त्याच वेळी सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसलेल्या एकनाथ खडसेंनी कटप्पाने बाहुबली को क्यो मारा असा सवाल विचारला. त्याचाच संदर्भ घेत जयंत पाटलांनी खडसेंसारख्या बाहुबलीला कोणत्या कटप्पानं मारलं असंही विचारलं.

जयंत पाटील म्हणाले, ' महाराष्ट्राला या प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे. आणि बाहुबली याचं उत्तर देतील तेव्हा महाराष्ट्रात भूकंप येईल. त्यांनीच असं मला सांगितलं. आम्ही त्या भूकंपाची वाट पाहतोय.' जयंत पाटील यांच्या वक्तव्यानं एकच हशा कोसळला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2017 03:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...