Home /News /mumbai /

जयंत पाटील राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष ?

जयंत पाटील राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष ?

जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे अशी माहिती सूत्रांनी न्यूज १८ लोकमतला दिली आहे.

मुंबई,28 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर सुनील तटकरे यांच्या जागी नवीन नियुक्ती जवळपास निश्चित होण्याची शक्यता आहे. तटकरे यांच्या जागी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदार संघातील जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे अशी माहिती सूत्रांनी न्यूज १८ लोकमतला दिली आहे. सुनील तटकरे यांनी कालच या प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त होण्याची भाषा केली होती. त्यात तटकरे यांना राष्ट्रीय महासचिव पदावर तात्काळ नियुक्ती केली. त्यामुळं तटकरे यांच्या जागी नवीन  प्रदेशाध्यक्ष नियुक्त होणारं हे निश्चित झाले आहे. पुण्यात २९ एप्रिलला प्रदेश अध्यक्ष निवड होणारं आहे. तटकरे यांच्या जागी आता सांगलीतील जयंत पाटील आणि सातारा जिल्हातील शशिकांत शिंदे यांची नावे चर्चेत आहे. त्यात ही जयंत यांचं नाव आघाडीवर असून जयंत पाटील यांचे नाव अंतिम होण्याची शक्यता जास्त आहे अशी सूत्राकडून माहिती मिळतेय. जयंत पाटील हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्याचवेळी सोबर चेहरा, अभ्यासू प्रतिमा, सहकार क्षेत्रात काम हे जमेची बाजू आहे. जयंत पाटील यांनी अर्थ खाते, गृह खाते, ग्रामविकास खात्याचा कारभार पाहिला आहे. पाटील यांच्या सोबतच सातारा येथील शशिकांत शिंदे यांचेही नाव चर्चेत आहे. शिंदे हे अजित पवार निकटवर्तीय आहे. माथाडीं कामगार नेते आहे. त्यामुळे पाटील की शिंदे की अन्य कोण यांवर अंतिम निर्णय शरद पवार घेणार आहेत.
First published:

Tags: Jayant patil, NCP, जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी

पुढील बातम्या