Home /News /mumbai /

'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली', जयंत पाटलांचा भाजपला सणसणीत टोला

'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली', जयंत पाटलांचा भाजपला सणसणीत टोला

'राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी...'

    मुंबई, 26 जून : स्थानिक स्वराज संस्थेत आरक्षण (obc reservation) रद्द झाल्यामुळे राज्यभरात चक्का जाम आंदोलन करत आहे. पण, ओबीसी आरक्षणाबाबत भाजपचे आंदोलन म्हणजे 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली' असं काही आहे, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी (ncp) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी लगावला. जयंत पाटील यांनी ट्वीट करून भाजपच्या आंदोलनाची एकाप्रकारे खिल्ली उडवली आहे. 'राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे' अशी टीका जयंत पाटील यांनी केली. तसंच, भाजपचे आजचे आंदोलन म्हणजे 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली' असंच काहीस आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला. त्या अध्यादेशावर बावनकुळेंनी सही करू दिली नाही -भुजबळ तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लोणावळ्यात सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण परिषदेतून फडणवीस यांच्यावर धक्कादायक विधान केले आहे. तुम्ही आंदोलन रस्त्यावर करत आहात, त्याचे स्वागत आहे. फडणवीस यांनी हा विषय पंतप्रधान मोदींकडे न्यावा आणि समाजला न्याय द्यावा.  सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी जो अध्यादेश काढला होता. त्यावर सही करू नका असं भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला येऊन सांगितलं होतं, असा खुलासा छगन भुजबळ यांनी केला. आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतलेल्या BJP कार्यकर्त्यांचा LIVE Video पाच वर्ष सगळी कामे करून घेतात. निवडणूक आली की म्हणतात ही माळी कुंभार वंजारी. आमचा मतदार संघ राखीव नाही त्याच कारण आमच्या मतदारसंघात कोणी उभे राहू शकतात, मतदारसंघात जाव लागते सगळ्यांना बरोबर घ्याव लागतं, हे ही समाजाने समजून घेतले पाहिजे, असंही भुजबळ म्हणाले. OBC आरक्षण मिळवून नाही दिलं तर राजकीय सन्यास घेईल - फडणवीस 'या राज्य सरकारमध्ये ओबीसी मंत्र्यांचे महत्व ताटातल्या चटणी, कोशिंबीर प्रमाणे आहे. मात्र हे मंत्री आपल्या राजकीय आकांच्या सांगण्यावरून तेच बोलतात. महाराष्ट्रात ज्या प्रकारे ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले त्यामुळे एक तर आरक्षण द्यावे लागेल नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. कांदिवली बनावट लसीकरण प्रकरण; बोगस लस पुरवणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याला अटक ओबीसीचे आरक्षण घालवले हे राजकीय षडयंत्र आहे. राज्याचे नेते काही झाले तर नरेंद्र मोदींकडे बोट दाखवतात. उद्या यांच्या बायकोनी मारले तरी तेव्हा देखील हे मोदी यांच्याकडेच बोट दाखवतील, असा सणसणीत टोलाही लगावला. या आरक्षणाचे खरे मारेकरी काँग्रेस आहे. काँग्रेस नेते यासाठी कोर्टात गेले होते. त्यामुळे आरक्षण गेले. आमच्या हाती सूत्र द्या, मी ओबीसींचे आरक्षण परत आणून दाखवले नाही तर राजकीय संन्यास घेईल, असंही फडणवीस म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Jayant patil

    पुढील बातम्या