• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • राज्य सरकार आरोग्य निधी पूर्ण खर्च करत नाही, जे.पी.नड्डांचा घरचा अहेर

राज्य सरकार आरोग्य निधी पूर्ण खर्च करत नाही, जे.पी.नड्डांचा घरचा अहेर

"आरोग्याचं बजेट कमी केलं जात आहे असं म्हणणं योग्य नाही. कारण त्या साठी भरपूर तरतूद करण्यात आलीये"

  • Share this:
22 एप्रिल : राज्याला देण्यात येणारा आरोग्य निधी राज्य सरकार पूर्ण खर्च करत नसल्याचं सांगत केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी सरकारला घरचा अहेर दिलाय. एबीव्हीपीतर्फे 2015 पासून मेड़ीव्हीजन या कार्यक्रमाचे आयोजन भारतात दर वर्षी केले जाते. या कार्यक्रामच्या माध्यमातून  आरोग्य या विषयावर चर्चा केली जाते. या वर्षी नवी मुंबईतील डी वाय पाटील विद्यापीठामध्ये या तीन दिवसीय चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा या कार्यक्रमाला उपस्थित होते. जे पी नड्डा यानी राज्याना आरोग्यासाठी दिल्या जाणाऱ्या निधी विषयी नाराजी व्यक्त केलीय. ते म्हणाले की, आरोग्याचं बजेट कमी केलं जात आहे असं म्हणणं योग्य नाही. कारण त्या साठी भरपूर तरतूद करण्यात आलीये. मात्र राज्याच पूर्ण निधी खर्च करीत नाही.  केंद्राकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत अशी माहितीही नड्डांनी दिली. मग प्रश्न असा येतो की, राज्यामध्ये आरोग्य यंत्रणांचे तीनतेरा वाजलेत हे काही लपलेलं नाहीय. अनेक ठिकाणी अद्ययावत सेवा सुविधांचा अभाव आहे. मग जर केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर निधी येतो. आणि तो पूर्ण वापरलाच जात नसेल तर मग दोष कुणाचा हा ही प्रश्न आहे. याचं उत्तर राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत देतील का?
First published: