• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • 'हे अत्यंत डिस्गस्टिंग', पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात

'हे अत्यंत डिस्गस्टिंग', पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात

'कायद्याने अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना देहदंडाची तरतूद आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी. महिला अत्याचार हा विषय राजकारणाच्या पलीकडे असला पाहिजे'

'कायद्याने अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना देहदंडाची तरतूद आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी. महिला अत्याचार हा विषय राजकारणाच्या पलीकडे असला पाहिजे'

'कायद्याने अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना देहदंडाची तरतूद आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी. महिला अत्याचार हा विषय राजकारणाच्या पलीकडे असला पाहिजे'

  • Share this:
  मुंबई, 24 सप्टेंबर :  बीडमध्ये (beed) करुण शर्मा (karuna sharma) यांना अटक आणि जामीन प्रकरणामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. या प्रकरणावर भाष्य करत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde)  यांनी 'राजकारणात चुकीचा पायंडा पडतोय, हे अत्यंत डिस्गस्टिंग आहे' अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde) यांच्यावर निशाणा साधला. बीडमध्ये करुणा शर्मा आल्या असता त्यांच्या गाडीमध्ये पिस्तुल सापडली होती. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना काही दिवस तुरुंगात ठेवण्यात आले होते. या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली. राजकारणात अशा घटनांमुळे चुकीचा पायंडा पडतोय, हे अत्यंत डिस्गस्टिंग आहे. अशा घटना लोकांचा राजकारणाकडे आणि राजकारण्यांकडे  लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलत असतात. माझं ट्विट फार न्यूट्रल आहे. अशा घटनांमुळे लोक सुन्न होत असतात, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. निम्मं धड गायब, पण अवघ्या 4.78 सेकंदात अचानक बदललं या तरुणाचं आयुष्य; पाहा Video बलात्काराचं कृत्य करणाऱ्याला देहदंडाची कायद्यात तरतूद आहे. त्याची अंमलबजावणी करणे गरजेचं आहे.  या घटना नुसत्या महिला अत्याचाराच्या आहेत, असं नाही त्यामुळे महिलांच्या मनात आतंक निर्माण करणाऱ्या आहेत. अशा कृत्य करणाऱ्यांचा थरकाप उडाला पाहिजे अशी पावलं सरकारने उचलली पाहिजे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात. अशा प्रकरणात पीडितेला तात्काळ न्याय मिळला पाहिजे, कायद्याने अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना देहदंडाची तरतूद आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी. महिला अत्याचार हा विषय राजकारणाच्या पलीकडे असला पाहिजे, असंही पंकजा म्हणाल्या. दिशा परमारने BIKINIमध्ये दाखवला बोल्ड अवतार; पती राहुल वैद्यसोबत मालदीवमध्ये.... 'आकडेवारी पाहता आमच्या सरकारच्या वेळी अशी परिस्थिती नव्हती हे मी म्हणू शकेन पण मला असे स्टेटमेंट  करायचं नाही. सरकारचा दबाव असला पाहिजे. आमच्या सरकारच्या वेळी घटना जास्त दिसत होत्या , पत्रकारांनी पण मला प्रश्न विचारले होते. कारण केसेस होत होत्या, लोक पोलीस स्टेशनला जात होते म्हणून आकडे जास्त दिसत होते, असंही पंकजा मुंडेंनी सांगितलं. ओबीसी आरक्षणासाठी आम्ही लढा दिला त्याचा सकारात्मक परिणाम दिसतोय. अध्यादेश काढला हा सगळ्या निवडणुकांना लागू होईल का हे मी आधीच म्हटलं होतं. पण पुढच्या निवडणूकापर्यंत डेटाचा कारण न देता आरक्षणाचा निर्णय सकारात्मक दृष्टीने पूर्णविराम देणं गरजेचं आहे, असं स्पष्ट मत पंकजांनी मांडलं.
Published by:sachin Salve
First published: