S M L

माझ्याविरोधात 'आदर्श' खटला चालवणे हा लोकशाहीचा खून - अशोक चव्हाण

2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपण निवडून आलो आणि त्यामुळेच आपल्याला लक्ष्य केलं जात आहे असा आरोपही त्यांनी केलाय. आपल्या विरोधात खटला चालवण्यासाठी किमान घटनात्मक आणि कायदेशीर प्रक्रिया पाळल्या गेल्या पाहिजेत

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 20, 2017 10:53 AM IST

माझ्याविरोधात 'आदर्श' खटला चालवणे हा लोकशाहीचा खून - अशोक चव्हाण

मुंबई,20 सप्टेंबर: आदर्श प्रकरणी आपल्याविरोधात खटला चालवण्याची परवानगी म्हणजे लोकशाहीचा खून असल्याचा युक्तिवाद अशोक चव्हाण यांच्यावतीनं मुंबई हायकोर्टात करण्यात आला आहे. आपल्या विरोधात खटला चालवण्यासाठी यापूर्वी राज्यपालांनी परवानगी नाकारली होती. पण राज्यात सत्ताबदल होताच खटला चालवायला सीबीआयला परवानगी देण्यात आली असं अशोक चव्हाण यांच्या वतीनं सांगण्यात आलं.

आदर्श घोटाळ्याप्रकरणी गेले तीन दिवस सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी आजही सुनावणी सुरू होणार आहे. अशोक चव्हाणांविरोधात युक्तिवाद आज संपेल अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. अशोक चव्हाण यांच्या विरोधात खटला चालवण्यास राज्यपाल विद्यासागर राव यांनी परवानगी दिली आहे. त्याला चव्हाण यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं आहे. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपण निवडून आलो आणि त्यामुळेच आपल्याला लक्ष्य केलं जात आहे असा आरोपही त्यांनी केलाय. आपल्या विरोधात खटला चालवण्यासाठी किमान घटनात्मक आणि कायदेशीर प्रक्रिया पाळल्या गेल्या पाहिजेत, अगदी मुंबईवर हल्ला करणाऱ्या अजमल कसाबाच्या वेळीही त्यानं काय केलं हे माहिती असूनही आपण कायदेशीर प्रक्रिया पाळली होती ही बाब चव्हाणाच्यां वतीनं कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.

आता कोर्ट या खटल्यावर काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 20, 2017 10:53 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close