असं असेल ठाकरे सरकारचं पहिलं अर्थसंकल्प, हे गाजतील मुद्दे

असं असेल ठाकरे सरकारचं पहिलं अर्थसंकल्प, हे गाजतील मुद्दे

सोमवारपासून मुंबईत महाविकास आघाडीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे.

  • Share this:

मुंबई, 23 फेब्रुवारी : काँग्रेस राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आलेल्या महाविकास आघाडी सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे.  महाविकास आघाडी राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर दीर्घकालीन असलेले पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल. या अधिवेशनात महाविकास आघाडीतील अन्य त्यांचा एकत्रित समन्वय किती आहे, एकजूट किती आहे? हे दिसणार आहे. तर दुसरीकडे विरोधक बाकावरील विधानसभेत देवेंद्र फडणवीस आक्रमक पद्धतीने आघाडी सरकारवर तुटून पडणार हे दिसू लागले आहे.

कोणते मुद्दे अधिवेशनात गाजणार?

अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी जलयुक्त शिवार बंद करण्याची चर्चा, राज्यातील कायदा व सुव्यवस्था, स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव प्रस्ताव हे मुद्दे विरोधी बाकांवर आक्रमक होताना दिसतील. तर दुसरीकडे फडणवीस सरकारमध्ये मागणी काही मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण त्याचे रिपोर्ट, वेगवेगळ्या योजनांसाठी दिलेला निधी यावरून सत्ताधारी पक्ष तत्कालीन फडवणीस सरकारमधील अनेकांची कोंडी करण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीमधील एकजूट अधिवेशनात दिसणार का?

तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्रित येत सत्ता स्थापन केली असली तरी CAA, NRC आणि NRP या सारखे मुद्दे तसेच मुस्लिम आरक्षण मुद्दे महाविकास आघाडीत अंतर्गत वाद मतभेद समोर येत आहेत. या मुद्द्यांवरून अधिवेशनात ज्यावेळेस चर्चा होईल त्यावेळेस महाविकास आघाडीतील सर्व मंत्री एकसंघ दिसतील का? याविषयी उत्सुकता आहे. विशेष म्हणजे, अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी CAA आणि NRC सारख्या मुद्द्यांवरून मुख्यमंत्री ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केल्यामुळे महाविकास आघाडीतील इतर नेत्यांना बोचणारे आहे, अशी चर्चा रंगली आहे.  यामुळे महाविकास आघाडीला अर्थसंकल्पीय अधिवेशन हे मोठे आव्हान असेल तर दुसरीकडे विरोधकांसाठी नामी संधी ठरण्याच शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2020 05:25 PM IST

ताज्या बातम्या