भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येतील, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याच्या दाव्याने खळबळ

भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येतील, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याच्या दाव्याने खळबळ

'लहान-सहान गोष्टींमुळे भाजप आणि शिवसेनेत दुरावा निर्माण झालाय. मात्र तो दुरावा दोघांच्याही फायद्याचा नाही.'

  • Share this:

मुंबई 10 डिसेंबर : विधानसभा निकालानंतर भाजप आणि शिवसेनेत कटुता निर्माण झाली. नवं सरकार सत्तेत आल्यानंतर ही कटुता जास्तच वाढलीय. तीस वर्षांची साथ सोडून शिवसेनेने जन्मापासून विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. एवढच नाही तर शिवसेना NDAतूनही बाहेर पडली. भाजपला धोबीपछाड देण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आल्याने भाजपला सत्तेबाहर राहावं लागलं आणि मोठा हादरा बसला. नवं सरकार येवून अजुन 15 दिवसही झालेले नसतानाच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी एक दावा केलाय. त्यांच्या या दाव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जोशींच्या या दाव्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मनोहर जोशी म्हणाले, काही लहान-सहान गोष्टींमुळे भाजप आणि शिवसेनेत दुरावा निर्माण झालाय. मात्र तो दुरावा दोघांच्याही फायद्याचा नाही. दोनही पक्ष आता वेगळे झाले असले तरी ते पुन्हा एकत्र येणारच नाहीत असं नाही असंही त्यांनी सांगितलं.

CM उद्धव ठाकरेंचा सत्ता स्थापनेवरून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

जोशी पुढे म्हणाले, भाजप शिवसेना एकत्र येवू शकतात. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे योग्यवेळी निर्णय घेतील. राज्याच्या भल्यासाठी थोडा त्याग केला पाहिजे. आपल्याला जे वाटतं तसच घडेल असं नाही. त्यासाठी सगळ्यांनीच दोन पावलं मागे यावं असंही त्यांनी सूचवलं. जोशींच्या या दाव्यामुळे राजकारणात नवीन चर्चा सुरू झालीय.

आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन पक्षांचं सरकार चालवणं हे आव्हान असल्याचं म्हटलं होतं. 13 दिवसानंतरही खातेवाटप झालं नसल्यामुळे नाराजीही व्यक्त होतेय. या पार्श्वभूमीवर मनोहर जोशी यांच्या या दाव्याला महत्त्व प्राप्त झालंय.

एकनाथ खडसेंना भेटणारच, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने भाजपची चिंता वाढली

सरकार लवकरच कोसळणार, भाजप नेत्याचा दावा

भाजपचे नेते गिरीश व्यास म्हणाले, नवं सरकार फक्त आढावा घेण्याच्या मागे आहेत. 13 दिवस झाल्यानंतरही त्यांनी साधं खात्यांचं वाटप केलेलं नाही. त्यातच अनेक योजना बंद करण्यात येत आहेत. असं कामकाज फार काळ चालणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार सहा महिन्याच्या आत कोसळणार असून मे- जून महिन्यात सरकार गडगडेल असं भाकितही त्यांनी केलं.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चांगलं खातं मिळण्यावरून मतभेद झाल्याने खातेवाटप रखडल्याचं बोललं जातंय. त्यावरून बैठकांना सुरुवातही झालीय. मात्र नागपूर अधिवेशनानंतर खाते वाटप आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यताही व्यक्त केलीय जातेय.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 10, 2019, 6:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading