'मनसे' निवडणूक लढविणार की नाही सस्पेंन्स कायम, राज ठाकरे घेणार अंतिम निर्णय

'बैठकीत काही कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवावी आणि काही कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवू नये अशी भूमिका मांडली. अंतिम निर्णय राज ठाकरेच घेणार'

News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2019 03:42 PM IST

'मनसे' निवडणूक लढविणार की नाही सस्पेंन्स कायम, राज ठाकरे घेणार अंतिम निर्णय

अक्षय कुडकेलवार, मुंबई 13 सप्टेंबर : लाव रे तो व्हिडीओ असं म्हणत लोकसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी उडविणाऱ्या राज ठाकरे यांची तोफ विधानसभा निवडणुकीत धडाडणार का? याबाबत सध्या संभ्रम निर्माण झालाय. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर आज नेत्यांची बैठक बोलवली होती. मात्र ही बैठक कुठल्याही निर्णयाविनाच संपली. विधानसभा निवडणुकीबाबात काय भूमिका घ्यायची हे राज ठाकरे लवकरच सांगतील अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. त्यामुळे राज ठाकरे निवडणूक लढणार नाहीत अशी चर्चा सुरू झालीय. या बैठकीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी माहिती देताना सांगितलं की, बैठकीत काही कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवावी आणि काही कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवू नये अशी भूमिका मांडली. राज ठाकरे यांनीही आपले विचार व्यक्त केलेत. आता काय निर्णय घ्यायचा हे राज ठाकरे ठरवणार असून लवकरच ते आपला निर्णय जाहीर करतील अशी माहिती नांदगावकर यांनी दिली.

मुख्यमंत्रीच करणार शिवसेनेचीही 'यादी', उद्धव ठाकरेंच्या खुलाश्याने धक्का

भाजपचा असलेला जोर, काँग्रेस-राष्ट्रवादीमधून नेत्यांचं पक्षांतर यामुळे राजकीय वातावरण युतीकडे झुकलंय. त्यामुळे निवडणूक लढवून काहीच फायदा नाही असं मनसेतल्या काही नेत्यांना वाटतं. EVM विरुद्ध भूमिका घेत सर्वच पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घालावा असं राज ठाकरेंचं मत आहे मात्र ती भूमिका आम्हा घेता येणार नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनीच दिली होती. त्यामुळे राज ठाकरे हे निवडणूक न लढविण्याची घोषणा करण्याचीही शक्यता आहे.

भाजपच्या 'या' नेत्याने शिवसेनेच्या मतदारसंघात जाहीर केली स्वत:चीच उमेदवारी

 

Loading...

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता असताना सगळ्यांना उत्सुकता आहे ती ‘युती’च्या जागावाटपाची. ‘युती’ होणार हे आता सगळ्यांनीच मान्य केल्यानं जागावाटपाचं काय होणार? कोण मोठा भाऊ? कोण छोटा भाऊ? याची चर्चा जोरात सुरू आहे. दोन्ही पक्षांमधले ज्येष्ठ नेते चर्चेच्या फेऱ्या करताहेत. मित्र पक्षांना 18 जागा सोडण्याचं मान्य झालंय. शिवसेना 50:50 च्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचंही बोललं जात होत. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा खुलासा केलाय. त्यांच्या या खुलाश्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून लवकरच ‘युती’च्या जागावटपाची घोषणा होईल अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

राष्ट्रवादीचे माजी प्रेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, यावेळी मी थोडी वेगळी पद्धत अवलंबली आहे. शिवसेनेला कुठल्या जागा असाव्यात याची यादी करायला मी मुख्यमंत्र्यांनाच सांगितलंय. ते आता आम्हाला किती आणि कुठल्या जागा द्यायच्या आहेत याची यादी देतील आणि मी ती आमच्या पक्षासमोर ठेवणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2019 03:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...