Home /News /mumbai /

'फडणवीसांनी आरक्षण दिले ते बेकायदेशीर होते, अशोक चव्हाणांचा पलटवार

'फडणवीसांनी आरक्षण दिले ते बेकायदेशीर होते, अशोक चव्हाणांचा पलटवार

'देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची फसवणूक केली आहे. अधिकार नसताना कायदा केला, विधानसभेचा अपमान केला'

  मुंबई, 05 मे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) निर्णयाला सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. या निर्णयाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटत आहे. महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाचा डाव सुरू झाला आहे. 'देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी जनतेची फसवणूक केली आहे. अधिकार नसताना कायदा केला, विधानसभेचा अपमान केला', अशी टीका काँग्रेसचे नेते आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि सेनेचे नेते विनायक राऊत यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. 'आजचा निकाल निराशाजनक आहे. महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे. ही लढाई अजून इथं संपली नाही. यासाठी लढा हा सुरूच राहणार आहे. पण देवेंद्र फडणवीस यांच्या काळात उच्च न्यायालयाने निकाल दिला. याच काळात हा खटला सर्वोच्च न्यायालयात गेला, याच खटल्यातले वकील या सुनावणीत होते. मराठा समाजातील इतर नेत्यांची वकिलांची फळी सोबत होती. इंद्रा सहाणी आणि 102 वी घटना दुरुस्ती यावर चर्चा झाली. फडणवीस सरकारने तयार केलेला जो गायकवाड समितीचा अहवाल आम्ही बहुमताने मंजूर केला होता, असं अशोक चव्हाण म्हणाले. बंगालमधील हिंसाचार रोखण्याचा राज्यपालांचा सल्ला,शपथ घेतल्यानंतर दीदी म्हणाल्या.. 'राज्याला अधिकार नाही. दुसऱ्या निकालात राज्याला अधिकार आहे ही भूमिका कशी होऊ शकते. एक मताने आम्ही मराठा आरक्षण कायदा पारित करून दिला. 102 व्या घटना दुरुस्ती नंतर कायदा करण्याचा राज्यांना अधिकार ना,ही हे स्पस्ट केले त्यानंतर फडणवीस यांनी आरक्षण दिले ते बेकायदेशीर होते, देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची फसवणूक केली आहे. अधिकार नसताना कायदा केला, विधानसभेचा अपमान केला, अशी टीकाही चव्हाण यांनी केली. '7 ते 8 राज्याचा निर्णय घटना दुरुस्ती पूर्वीचा आहे आणि आपल्या सरकारने 2018 ला घटना दुरुस्तीनंतर आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या कक्षेत हा निर्णय आहे त्यांनी आरक्षण द्यावे' असंही चव्हाण म्हणाले. गायकवाड समितीचा अहवाल भाषांतर करून दिला आहे, फडणवीस यांनी यावरून जनतेची दिशाभूल करू नये, अशी टीकाही चव्हाण यांनी केली. तर, देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची दिशाभूल केली. राज्याला अधिकार नसताना कायदा केला. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे पाठबळ आहे. जी लोकं सरकारच्या विरोधात याचिका टाकत आहेत त्यांनी मराठा समाज निर्णय विरोधात याचिका केली, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला. VIDEO : अवघ्या एक दिवसाच्या बाळाने केली Corona वर मात; नाशिकच्या डॉक्टरांची शर्थ ' हा कायदा करण्याचा राज्याला अधिकार आहेत का यावर मतभिन्नता झाली त्यावर हा निर्णय झाला.  फडणवीस म्हणाले कायद्याला स्थगिती देता येत नाही, मग स्थगिती का दिली, 9 राज्यांच्या कायद्याला का नाही दिली', असा सवाल शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी केला.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Maratha reservation

  पुढील बातम्या